![]()
महाराष्ट्रातील धर्म, अध्यात्म, सामाजिक समरसता आणि एकतेसोबत आपल्या कलेला वाव देणारा, सुप्त गुणांना चालना देणारा आनंद उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेश विसर्जन हे प्रत्येकाच्या मनाला वेदनादायी असले तरी प्रत्येकाच्या मनोकामना पूर्तीसोबत अकोल्याच्या कल्याणासा
.
आमदार रणधीर सावरकर यांनी वेदपाठी ब्राह्मणांच्या हस्ते हे पूजन करून भक्तांच्या व अकोलेकरांच्या, अकोला पंचक्रोशी आणि अकोला जिल्ह्यातील भक्तांच्या वतीने गणरायाला वंदन केले. यावेळी ब्राह्मण हेमंत शर्मा, अॅड. आनंद रानडे, गिरीश जोशी, जनक जोशी, संतोष शुक्ला, राजेश शिरोळे, सौरभ छानगाणी, अशोक छानगाणी यांच्या वेद-मंत्रोच्चाराने विशेष पूजा करण्यात आली. भाजपचे प्रसिद्धिप्रमुख माजी नगरसेवक गिरीश जोशी यांच्या संकल्पनेतून २० वर्षांपूर्वी स्व. आमदार गोवर्धन शर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे यांच्या पुढाकाराने सुरू केलेली ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. आजच्या कार्यक्रमाला भाजप नेते व स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदाताई खेडकर, रणजित खेडकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सिद्धार्थ शर्मा, पवन महाले, अमोल गावंडे, जयंत मसने, संतोष शिवरकर, माधव मानकर, एड. कल्पना गोटफोडे, नितीन ताकवले, मनीष गावंडे, संजय कोरडे, चंदा शर्मा, विद्याधर काकड, प्राची काकडे, अॅड. रूपाली काकडे, संदीप गावंडे, शरद तुरकर, वैशाली शेळके, सागर शेगोकार, धनंजय धबाले, योगिता पावसाळे, गणेश अंधारे, विनोद मापारी, सुनीता अग्रवाल, प्रशांत जोशी, नीता जगताप, शशिकला काळे, प्रकाश धोगलीया, आरती धोगलीया, भूषण इंदोरिया, पुरुषोत्तम पानझाडे, प्रकाश श्रीमाळी, सिद्धार्थ उपरवट, राजेश्वर धोटे, तुषार भिरड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.