Headlines

कालव्याच्या गळतीमुळे शिरढोण ओढ्यातून पाणी गेले कर्नाटकात:पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांची अडचण‎




गतवर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे शनिवारपासून कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडलेले पाणी शिरढोण ओढ्यातून कर्नाटकात वाहून गेल्याने पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त आहे. मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील खरिपाचे पीक पूर्णत: वाया गेले आहे. तालुक्यातील नदीकाठचे क्षेत्र वगळता उर्वरित कालव्याच्या पाण्यावर व पावसावर अवलंबून आहे. उजनी कालवा क्रमांक ४८ च्या शेवटच्या टोकाला कात्राळ व कर्जाळ व हुलजंती ही सीमावर्ती भागातील गावे येतात. मात्र कर्जाळ परिसरातील उजनी कालव्याच्या ४८ क्रमांकाच्या कालव्यातून हे पाणी कर्नाटकातील शिरढोणच्या ओढ्यातून वाहून गेले असून, कात्राळ व कर्जाळ परिसरातील पिके जळून जात असताना पाणी वाहून जात असल्याचे शेतकऱ्यांनी उजनी विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले होते,मात्र अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, उजनी पूर्ण क्षमतेने भरून देखील कालव्यातील लाभदायक शेतकऱ्यांना भविष्यात या गळतीमुळे पाणी कधी मिळणार व गळती रोखण्यासाठी शासन निधी कधी उपलब्ध करणार हा प्रश्न देखील या निमित्ताने महत्त्वाचा आहे. कात्राळ व कर्जाळ परिसरातील बंधारे व तलावांमध्ये पाणी सोडण्याची गरज असताना, अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पाणी अडवले जात नाही आणि हेच पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहून जाते पावसाने ओढ दिली. शिवाय उजनी पूर्ण भरली कालव्याच्या गळतीमुळे भविष्यात पाण्याची पाळीदेखील लांबणीवर पडणार आहे. या भागातील शेती पिके पूर्ण अडचणीत आली याची नुकसान भरपाई कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदरची बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार लक्षात आणून सुद्धा अधिकारी जाणून बुजून निष्काळजीपणा व दुर्लक्ष करत आहेत. भीषण टंचाईमध्ये अधिकाऱ्यांनी अस्थिरीकरण आणि कॅनॉलची साफसफाई न केल्याने लाखो लिटर पाणी कर्नाटकात वाहून गेले . संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. – अॅड.राहुल घुले, काँग्रेस शहराध्यक्ष आंदोलनानंतर तलाव भरून दिले मात्र पाणी गेले वाहून सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे सीमावर्ती भागातील पिके संकटात आहेत. त्या पिकांना पाणी द्यावे म्हणून सातत्याने मागणी केली मात्र तलावात पाणी सोडले जात नसल्याने शिवसेनेचे राजकुमार स्वामी यांनी आंदोलन केल्यानंतर बोराळे व नंदुर परिसरातील तलाव भरून दिले. मात्र कर्जाळ कात्राळ परिसरातील तलाव अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र दरवर्षी कालव्यातील भराव दुरुस्त करून पाणी देण्याच्या बाबतीने संबंधित खात्याकडून दुर्लक्ष केल्याने हे पाणी परराज्यात वाहून गेले आहे. दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करणर आहे ^दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करणर आहे टेलएंड असल्यामुळे पाणी कॅनॉल कालव्याच्या भराव्याच्या गळतीमधून वाहून गेले असून, लवकरच दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणार आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर हे काम हाती घेण्यात येईल. -नागेश जडे , शाखा अभियंता उजनी ४८



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *