Headlines

अल्प पर्जन्यमान, दुष्काळी परिस्थितीत बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान:डॉ. चारुदत्त मायी यांचे प्रतिपादन, 3 दिवसीय शिवार फेरी व चर्चासत्राचा समारोप‎



हवामान बदलाच्या लहरीपणामुळे शेती क्षेत्रासमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. मान्सूनचे उशिरा आगमन, पेरणीनंतर पावसाचा प्रदीर्घ खंड, ऐन काढणीच्या वेळी होणारी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अशा विषम हवामानात आणि अल्प पर्जन्यमानाच्या द

.

या पद्धतीमध्ये ट्रॅक्टर-चलित किंवा बैलांच्या साहाय्याने चालणाऱ्या विशेष यंत्राद्वारे पेरणी केली जाते. यात ठरावीक अंतरावर रुंद वरंबा (गादी वाफा) तयार होतो. हवा खेळती राहिल्याने मुळांची वाढ जोमदार होते. दुष्काळी स्थितीतही पीक तग धरून राहते. याउलट, अचानक अतिवृष्टी झाल्यास शेतातील अतिरिक्त पाणी या चरांवाटे नैसर्गिकरीत्या वाहून जाते. त्यामुळे पिकांमध्ये पाणी तुंबून राहण्याची समस्या उद्भवत नाही.

शिवार फेरी म्हणजे विद्यापीठाने केलेले संशोधन व विस्तार कार्याचा उत्कृष्ट समन्वय असून बियाणे उत्पादन व कृषी निविष्ठा उत्पादनाच्या माध्यमातून स्वयंपूर्णतेचा विद्यापीठाचा संकल्प असल्याचे दिसून येते. असे प्रतिपादन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा आमदार रणधीर सावरकर यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सत्रात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, अकोला पालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, आत्माचे संचालक डॉ. मुरली इंगळे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, सहयोगी संचालक संशोधन डॉ. अनिल कोल्हे, नियंत्रक हेमंत ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

बीबीएफ तंत्रज्ञानाचे शेतीसाठी प्रमुख फायदे १. दुष्काळात ओलावा संधारण: पावसाचा दीर्घ खंड पडल्यास चरांमध्ये ओलावा टिकून राहिल्याने पिके करपत नाहीत. २. अतिवृष्टीपासून संरक्षण: शेतात अतिरिक्त पाणी साचत नाही; चरांवाटे अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा होतो. ३. उत्पादनात घसघशीत वाढ: पिकांची वाढ जोमदार होऊन सरासरी उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. ४. बियाणे व खर्चाची बचत: पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यात २० ते २५ टक्के बचत होते आणि रासायनिक खतांचा योग्य वापर होतो. ५. सुलभ आंतरमशागत: चरांमधून फवारणी, खते देणे आणि तण काढणे सोपे जाते; पिकांचे कोणतेही नुकसान होत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *