![]()
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांच्या पुणे पदवीधर मतदार संघात तब्बल १ कोटी २५ लाख पदवीधर आहेत. त्यापैकी गतवेळी केवळ १ लाख २५ हजार मतदान झाले होते. पदवीधरांनी याबाबत गहाळ न राहता मतदार याद्यांत आपली नावे समाविष्ट करून हा मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी अकलूज येथे बैठकीचे आयोजन केले होते. रणजितसिंह म्हणाले, या पदवीधर मतदार संघाच्या यादीत नाव दाखल करण्याची अंतिम मुदत दि. २६ सप्टेंबर आहे. नंतर पुरवणी यादीत नावे घालता येतील. परंतु सर्व पदवीधरांनी याबाबत सजगता ठेवून आपली नावे ऑनलाइन किंवा संबंधित यंत्रणांकडून समाविष्ट करून घ्यावीत. दि. २३ ऑक्टोबर रोजी यासाठी आपण निवडलेल्या ठिकाणी मतदान होईल. माळशिरस तालुक्यात सुमारे ५० हजार पदवीधर असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बोरगाव येथील प्राध्यापक सागर साठे यांनी सविस्तर माहिती सांगितली ७७४४०५२४३१अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सहकारमहर्षी कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते- पाटील, ॲड. प्रकाश पाटील, ॲड. मिलिंद कुलकर्णी, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व पदवीधर युवक उपस्थित होते. निरा कालव्यातून रब्बीसाठी दोन आवर्तने दिली जाणार आहेत. खरिपाचे पहिले आवर्तन सध्या सुरू आहे. त्यालाच दुसरे जोड आवर्तन दिले तर निरा कालव्यातून उन्हाळ्यात पाणी मिळणार नाही. खरिपाचे दुसरे आवर्तन थांबवले तरच ते पाणी उन्हाळ्यात एका आवर्तनासाठी वापरता येईल, अशी जुजबी चर्चा जलसंपदा विभागाबरोबर झाल्याचे रणजितसिंह यांनी सांगितले. त्यामुळे निरा कालव्यातून उन्हाळ्यात पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
Source link
पदवीधरला सव्वा कोटी मतदार, मतदान मात्र कमी:मतदान वाढवण्याची जागृती करण्यासाठी अकलूजमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटलांनी घेतली बैठक