Headlines

रूढींची चौकट मोडली; एकल महिलांना आरतीचा मान:साऊ एकल महिला समितीचा पुढाकार; अकोलेसह सहा गावांतील गणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎



धार्मिक कार्यक्रमांसह सार्वजनिक गणेशोत्सवात विधवा व एकल महिलांना दूर ठेवण्याच्या जुन्या रूढींना छेद देत अकोले तालुक्यात यंदा सामाजिक समतेचा नवा प्रयोग झाला. साऊ एकल महिला समितीच्या पुढाकाराने तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये एकल महिलांच्य

.

गणेश मंडळांनी एकल मातांना आरतीसाठी आमंत्रित करून धार्मिक विधीसोबत सामाजिक सन्मानाचाही संदेश दिला. आतापर्यंत आरतीचा मान प्रामुख्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जात असे. मात्र, एकल महिलांना हा मान देत त्यांना सार्वजनिक सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बदलामुळे महिलांसह त्यांच्या कुटुंबातील मुलांमध्ये आनंद व आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होत असल्याचे समितीने सांगितले.

समितीच्या मार्गदर्शक प्रतिमा हेरंब कुलकर्णी म्हणाल्या, स्वातंत्र्यदिनी विविध ठिकाणी एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम राबवला होता. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून गणेशोत्सवात आरतीचा संकल्प केला. गणेश मंडळांनी दिलेला प्रतिसाद सामाजिक बदलाची सकारात्मक सुरुवात आहे. या उपक्रमासाठी नीता शिंदे, सिना चव्हाण, माधुरी वाकचौरे, कल्पना सोनुले व वैशाली राजगुरू यांनी परिश्रम घेतले. सार्वजनिक गणेशोत्सवात झालेला हा बदल जनतेतून कौतुकास्पद ठरत असून, मानवता, धर्म आणि संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला आहे.

एकल महिलांना धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये समान सन्मान मिळण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. गणेशोत्सवातील आरतीपासून सुरू झालेला हा बदल आगामी इतर सार्वजनिक सन्मानाची परंपरा रुजवणारा ठरणार आहे. त्यासाठी समितीलाही प्रयत्न करावे लागतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *