Headlines

16 ब्रास बँड पथकांच्या निनादामध्ये दिंडोरीत गणरायाला भावपूर्ण निरोप:फटाक्यांच्या आतषबाजीत शहरात आठ तास चालली विसर्जन मिरवणूक‎



१६ प्रसिद्ध ब्रास बँड पथकांच्या सुरावली आणि निनादात दिंडोरीत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेशोत्सवाच्या सांगता दिनी अथांग उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात निघालेली विसर्जन मिरवणूक तब

.

वेगवेगळ्या तालांवर वाजणाऱ्या सुरावली, फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि नयनरम्य रोषणाईने मिरवणुकीतील रंगत आणखी वाढवली. शहरातील नाशिक-कळवण रोड, पालखेड रोड व निळवडी रोड या प्रमुख मार्गांवरून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी दिंडोरीसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी बाप्पाची महाआरती करण्यात आली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे व नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आठ तास चाललेल्या या सोहळ्यात शहरवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला भक्तिभावाने आणि अश्रूभरल्या डोळ्यांनी पुढच्या वर्षी लवकर या, अशी साद घालत निरोप दिला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत नाशिक-कळवण रोड, पालखेड आणि निळवडी रोडवर सलग आठ तास चाललेल्या सोहळ्यात १६ प्रसिद्ध ब्रास बँड पथकांनी एकापाठोपाठ एक देशभक्तीपर आणि भक्तीगीतांच्या एकापेक्षा एक सरस धून वाजवून शहरवासीयांची मने जिंकली. फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईच्या झगमगाटात प्रत्येक चौकात वाद्यांच्या तालावर अबालवृद्ध उत्स्फूर्तपणे थिरकताना दिसत होते. उत्साही, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन सोहळा पार पडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *