Headlines

भागीरथी विद्यालयामध्ये तालुकास्तरीय ‎बुद्धिबळ स्पर्धा:135 खेळाडू सहभागी‎, प्रत्येक गटातील विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड




वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील भागीरथी माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जि. प. प्रशाला बोरसर, आरोहण अकॅडमी वैजापूर, सेंट मोनिका स्कूल वैजापूर, जि. प. प्रशाला संजयपूरवाडी, स्व. संचेती माध्यमिक विद्यालय कनकसागज, छत्रपती इंटरनॅशनल स्कूल वैजापूर, विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर, सेंट मोनिका इंटरनॅशनल स्कूल, एल. डी. पी. बोर दहेगाव, न्यू हायस्कूल वैजापूर, भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव व संजीवनी अकॅडमी वैजापूर आदी विद्यालयांच्या १३५ खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या बुद्धिकौशल्याचे प्रदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. एम. हजारे होते. प्रमुख अतिथी म्हणून वैजापूर तालुका क्रीडा संयोजक भाऊसाहेब खरात, संचालक दत्तात्रय सुरासे, भीमराव वाठोरे तसेच विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख भरत निंबाळकर उपस्थित होते. सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख मनीषा उमेदळ यांनी केले, तर आभार सुरजकुमार साळवे यांनी मानले. क्रीडा शिक्षक उषा अंभोरे, मुनवर शेख, कविता दिवेकर, कुणाल मोरे, गौरव गायकवाड, गीता वेळजकर, निकिता आहेर व टी. आर. तुपे यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. वैजापूर तालुक्यातील भागीरथी विद्यालयात बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत विविध वयोगटांत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. १४ वर्षे बाल गटात मुलांमधून आदित्य भिंगारे प्रथम, आयुष पालवे द्वितीय तर अथर्व गोडाम तृतीय आला; तर मुलींमधून तरल पाटील प्रथम, खुशी कुमावत द्वितीय व पूर्वा पैठणे तृतीय आली. १७ वर्षे शालेय गटात मुलांमधून वेदराज जगताप प्रथम, सोहम काकडे द्वितीय व श्रेयस शिंदे तृतीय आला; तर मुलींमधून मानसी वाघ प्रथम, सीमा जोनवाळ द्वितीय व कल्पिता बोरा तृतीय आली. १९ वर्षे शालेय गटात मुलांमधून तन्मय गायकवाड प्रथम, कुणाल वडगावकर द्वितीय तर विनायकराव पाटील महाविद्यालयाचा खेळाडू तृतीय आला; मुलींमधून राधिका गायकवाड प्रथम, रितिका गायकवाड द्वितीय व स्वानंदी साठे तृतीय आली. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता सुनील भवर, प्रमोद चव्हाण, राजेश्वर विभुते, गणेश जगताप, प्रवीण जाधव, सागर राजपूत, रोहिदास त्रिभुवन, भारत भोपळे, निर्मला क्षीरसाठ, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, जयश्री बोर्डे, अधीक्षक मंजुषा सपकाळ, समाधान सुरासे, मंगेश दुतोंडे, मोहिनी अनवडे, ज्ञानदेव तायडे आदींचे सहकार्य लाभले. विजयी खेळाडूंची आता जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *