Headlines

घातक अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी ओझोनची जनजागृती आवश्यक:सटाणा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. शार्दूल यांचे प्रतिपादन‎




वाढते औद्योगिकीकरण आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालल्याने ओझोन थराच्या ऱ्हासाचे अत्यंत गंभीर परिणाम मानवी समाजासमोर येत आहेत; त्यामुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टी वाचवण्यासाठी ओझोन थराचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत व्यापक जनजागृती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भूगोलतज्ज्ञ डॉ. प्रविण शार्दूल यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक ओझोन दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अनिल पाटील होते. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या घातक अतिनील किरणांपासून मानवासह प्राणी, वनस्पती आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य ओझोन थर करतो. मात्र, पर्यावरणीय असमतोल आणि औद्योगिक उत्पादनांतील रसायनांचा बेसुमार वापर यामुळे ओझोन थराला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, भूगोल विभागप्रमुख डॉ. नानासाहेब घोलप, डॉ. धनराज आहिरे, प्रा. यशवंत जाधव व प्रा. नानासाहेब निकम उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *