Headlines

1,834 मंडळे देणार गणरायाला निरोप‎:ढोल-ताशा, टाळ-मृदंगाचा गजर, पैठणमध्ये मिरवणुकीवर होणार फुलांचा वर्षाव‎



जिल्ह्यात गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता होत असून, आज अनंत चतुर्दशीनिमित्त जिल्हाभरातील विविध नद्या, तलाव आणि विसर्जन विहिरींवर लहान-मोठ्या मिळून १ हजार ८३४ गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासा

.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसअंतर्गत विसर्जन मिरवणुका शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १,८३४ सार्वजनिक गणेश मंडळे असून, ४६७ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान, खुलताबाद शहरातील १० व ग्रामीण भागातील ७१ अशा एकूण ८१ सार्वजनिक गणेश मंडळांसह शेकडो घरगुती गणपतींना निरोप दिला जाईल. भक्तनिवासजवळील विहिरीत विसर्जनाची सोय केली असून, ५५ पोलिस व ३० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. सोयगाव तालुक्यात ७५ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन सोयगाव शहर, आमखेडा व जरंडी रस्त्यावरील तलावात होईल. बंदोबस्तासाठी सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली २ अधिकारी, २८ पोलिस अंमलदार व २८ होमगार्ड तैनात आहेत. रजाळवाडी : महादेव मंदिर बारव येथे होणार विसर्जन सिल्लोड शहरातील ३६ सार्वजनिक व १२,००० घरगुती गणेशमूर्तींचे रजाळवाडी तलाव व महादेव मंदिर बारव येथे विसर्जन होणार आहे. पोलिस निरीक्षक शामसुंदर कवठाळे यांच्या नेतृत्वात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कन्नड : ३५० मंडळांकडून निघणार गणरायाची मिरवणूक तालुक्यात सुमारे ३५० हून अधिक सार्वजनिक आणि हजारो घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. सुरक्षेसाठी २५० हून अधिक पोलिस आणि ५१ होमगार्ड तैनात आहेत. संवेदनशील गावांमधून पथसंचलन करण्यात आले. फुलंब्री : तालुक्यात पोलिस प्रशासनाकडून पथसंचलन शहरातील २० आणि ग्रामीण ५० मिळून ७० मंडळांच्या गणरायाचे विसर्जन होईल. फुलंब्री पोलिस हद्दीत डीवायएसपी डॉ. सोनाली पाईकराव यांच्यासह ३९ पोलिस आणि वडोद बाजार हद्दीत सपोनि जयसिंग जोनवाल यांच्या नेतृत्वात बंदोबस्त राहील.

डीजे वाजवण्याला बंदी; टाळ-मृदंगाचा गजर यंदा डीजेला बंदी असल्याने अनेक गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत टाळ-मृदंगाचा गजर करीत मिरवणूक काढण्याचे निश्चित केले आहे. पैठण, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर येथील एक गाव-एक गणपती असलेल्या ठिकाणी फुलांची उधळण करीत गणरायाला निरोप देण्यात येणार आहे.

वैजापूर : १२५ पोलिसांचा राहणार कडेकोट बंदोबस्त वैजापूर शहर ३६, ग्रामीण १३, शिऊर २४ व वीरगाव ३२ मिळून १०५ सार्वजनिक मंडळांचे विसर्जन होणार आहे. १२५ पेक्षा अधिक पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि ९० होमगार्ड जवान असा २-०० हून अधिक मनुष्यबळाचा ताफा तैनात आहे.

कायगाव : गोदापात्रात होणार विसर्जन, प्रशासनाची तयारी कायगाव येथील गोदावरी पात्रात ३,५०० ते ४,००० गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. सुरक्षेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी जानव्ही शेखर व पोलिस निरीक्षक सलीम चाउस यांच्यासह ८० पोलिस, होमगार्ड, जलरक्षक तैनात राहणा आहे.

विसर्जनाच्या सुरक्षेसाठी १ पोलिस अधीक्षक, १ अपर पोलिस अधीक्षक, ७ पोलिस उपअधीक्षक, १८ पोलिस निरीक्षक, ३६ सहायक पोलिस निरीक्षक आणि ७६ पोलिस उपनिरीक्षक मैदानात उतरणार आहेत. तसेच १,५०० अंमलदार, ६५० होमगार्ड, राज्य राखीव दलाची १ कंपनी आणि ५० प्रशिक्षणार्थी पोलिस अंमलदार असा मोठा ताफा सुरक्षेसाठी सज्ज करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *