Headlines

गोशाळेत 221 वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश:माता – पिता गोशाळा, वनीकरण विभागाचा उपक्रम‎




सोयगाव सामाजिक वनीकरण विभाग व माता-पिता गोशाळा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २१) गोशाळेच्या परिसरात २२१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच परिसरात ऑक्सिजनची निर्मिती वाढावी आणि हिरवळ वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशातून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. या वेळी दीर्घायुषी व पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या वड, पिंपळ, कडुलिंब, बेल, शिसम, अशोक, करंज, क्षमीपत्र आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर गरुड होते. प्रमुख उपस्थितीत सामाजिक वनीकरण अधिकारी विजय सपकाळ, समाधान धनवई, माता-पिता गोशाळा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनोज गायकवाड, माजी सरपंच वसंत बनकर, राजेंद्रसिंग देशमुख, राजू ठाकूर, दीपक पाटील, राजेंद्र महाजन, दिलीप शिंदे, प्रितम बडगुजर, राजेंद्र गायकवाड, योगेश उमाळे, रोहिदास महाराज, रवींद्र देशमुख, जितेंद्र देशमुख, शिवाजी पाटील, अमोल पाटील, निलेश पाटील, लोटन कुंभार, बाजीराव गिते, संतोष पाटील, निलेश जोशी, संजय चौधरी, दिनेश बडगुजर, छोटू सोनवणे, डॉ. गौरव जोशी, गोरख पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. के. पाटील यांनी केले, तर आभार दिनेश गायकवाड यांनी मानले. गोशाळेच्या परिसरात वृक्षारोपण करताना मान्यवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *