Headlines

पावसात ब्रेकचे लायनर चिटकल्याने गोल टेकडी परिसरात ट्रक उलटला:सोलापूरहून दिल्लीला टोमॅटो घेऊन जाताना अजिंठ्याजवळ अपघात‎‎




सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक अचानक ब्रेकचे लायनर चिटकल्यामुळे नियंत्रण सुटून पलटी झाल्याची घटना घडली. अजिंठा जवळील गोल टेकडी परिसरात बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सोलापूरहून दिल्लीकडे टोमॅटो वाहून नेणारा ट्रक अजिंठा परिसरातून जात असताना मुसळधार पावसामुळे महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर चिखल साचला होता. रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक चालक मुस्तकिम मेवाती (रा. बुलढाणा) याने अचानक ब्रेक दाबला. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे ब्रेकची लायनर ब्रेक ड्रमला थेट चिटकली. यामुळे ट्रक मातीत घसरला आणि महामार्गाच्या कडेला असलेल्या गोल टेकडीजवळ उलटला. या अपघातात ट्रकचे आणि त्यात भरलेल्या टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या भीषण अपघातात चालक मुस्तकिम मेवाती हा सुखरूप बचावला असून त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच अजिंठा येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चालकाला बाहेर काढले आणि मदतीचा हात देत रुग्णालयात दाखल केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *