Headlines

पाच दशकांची परंपरा जपत बोरगाव बाजार येथे गणेश विसर्जन उत्साहात:भारुड-भजनांनी आणली रंगत, सायंकाळी भंडाऱ्याचे आयोजन‎



सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे गणेश विसर्जन सोहळा गुरुवारी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. गणरायाच्या जयघोषासह टाळ-मृदंगाच्या निनादात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत स्थानिक व बाहेरून आलेल्या कलावंतांनी सादर केलेल्या भारु

.

बोरगाव बाजार येथे गेल्या सुमारे पाच दशकांपासूनअनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी गणेश विसर्जन करण्याची अनोखी प्रथा आहे. गावातील जुन्या जाणकार नागरिकांच्या माहितीनुसार, पूर्वी काही स्थानिक कारणांमुळे विसर्जन एक दिवस आधी करण्याची पद्धत सुरू झाली होती. कालांतराने ही पद्धत गावाची एक दृढ परंपरा बनली असून, आजही सर्व ग्रामस्थ ही परंपरा अतिशय श्रद्धेने जपत आहेत. ही आगळीवेगळी विसर्जन मिरवणूक आणि भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी बोरगांव बाजारसह परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

संपूर्ण परिसर बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. विसर्जन मिरवणुकीदरम्यान टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. परिसरातील विविध गाव-खेड्यांतून आलेल्या भजनी मंडळी आणि कलावंतांनी सामाजिक व धार्मिक विषयांवर बहारदार भारुडे सादर केली. उपस्थितांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आल्याने कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला. भारुडाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक व सामाजिक संदेश देत कलावंतांनी उपस्थितांची मने जिंकली.

एक दिवस आधी गणेश विसर्जन करण्याची पाच दशकांची प्रथा बोरगाव बाजार येथे गेल्या सुमारे पाच दशकांपासून अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी गणेश विसर्जन करण्याची अनोखी प्रथा आहे. गावातील जुन्या जाणकार नागरिकांच्या माहितीनुसार, पूर्वी काही स्थानिक कारणांमुळे विसर्जन एक दिवस आधी करण्याची पद्धत सुरू झाली होती. कालांतराने ही पद्धत गावाची एक दृढ परंपरा बनली असून, आजही सर्व ग्रामस्थ ही परंपरा अतिशय श्रद्धेने जपत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *