Headlines

सेवा संकल्प अभियानांतर्गत रास्त भाव दुकानात ई-केवायसी मोहीम:तहसीलदार गोपाळ पाटील यांची पाहणी; 50 लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण‎




राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत एरंडोल शहरातील गांधीपुरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संचालित रास्त भाव दुकानात शिधापत्रिका धारकांसाठी विशेष ई-केवायसी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने आयोजित या मोहिमेत सुमारे ५० ते ५५ लाभार्थ्यांची ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. मोहिमेची पाहणी करण्यासाठी तहसीलदार गोपाळ पाटील आणि पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी रास्त भाव दुकानाला भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीत ई-केवायसीचे कामकाज सुरळीतपणे पार पडले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष मंगलाबाई बडगुजर, सेल्समन ज्ञानेश्वर घुगे, ईश्वर बिराडे, विविध रास्त भाव दुकानदार तसेच परिसरातील नागरिक व लाभार्थी उपस्थित होते. शिधापत्रिका धारकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *