Headlines

विषमतेविरोधात महात्मा फुलेंचा संघर्ष दिशादर्शक‎:अक्कलकोटच्या खेडगी कॉलेजमधील व्याख्यानमालेत दत्ता थोरे यांचे प्रतिपादन




अक्कलकोट जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने स्वीकारत आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आशावादी दृष्टिकोन आवश्यक आहे. सुख-दुःख, यश-अपयश हे जीवनाचा अविभाज्य भाग असून, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की जगणे अधिक सुंदर आणि आनंददायी होते, असे प्रतिपादन पंढरपूरच्या उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. सविता दुधभाते यांनी केले. अक्कलकोट महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित बुद्धिक व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प जगणं सुंदर आहे या विषयावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या वैदेही वैद्य हे होते. प्रा. दुधभाते यांनी आपल्या व्याख्यानातून जीवनातील सकारात्मक विचारांचे महत्त्व, नातेसंबंधातील जिव्हाळा, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि स्वतःमधील सामर्थ्य ओळखण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. जीवनात येणाऱ्या अडचणींकडे केवळ समस्या म्हणून न पाहता त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहिल्यास व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. आनंदी जीवनासाठी बाह्य साधनांपेक्षा मनाची सकारात्मकता अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत प्रा. दीपीका भकरे यांनी केले. प्रास्ताविक भाषण विजया कोन्हाळी यांनी केले. वक्तेंचा परिचय स्नेहा लच्याणे यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी चांगभले हिने केले. पतसंस्थेचे संचालिका शैला गिरी यांनी केले. दत्ता थोरे म्हणाले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, सत्यशोधक समाजाची स्थापना, सामाजिक विषमतेविरोधातील त्यांचा संघर्ष तसेच शेतकरी आणि वंचित घटकांसाठी मांडलेले विचार कृतिशील होते. फुले यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्यांच्या विचारांतील समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये आजच्या युवकांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रतिनिधी | अक्कलकोट महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजच्या पिढीसाठीही दिशादर्शक आहे. असे प्रतिपादन व्याख्याते दत्ता थोरे यांनी केले. येथील खेडगीज कॉलेज आणि अक्कलकोट महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात ‘समाजसुधारक जोतिबा फुले’ या विषयावर दत्ता थोरे यांचे व्याख्यान झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक अॅड. अनिल मंगरूळे होते. व्यासपीठावर चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, चन्नवीर मठ, प्रभारी प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, वैदेही वैद्य, निलप्पा भरमशेट्टी, अशोक कोरे, डॉ. अशोक माळगे, दत्तात्रय होटकर यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. आदर्श पुरस्कार प्राप्त वैदेही वैद्य, डॉ. लता हिंडोळे तसेच वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेत यश मिळविणाऱ्या वैष्णवी चांगभले, शुभांगी पाटील व सृष्टी दिंडोरे यांचा गौरव केला. समाजसुधारक जोतिबा फुले यांच्याप्रमाणे गरीब व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या खेडगी कुटुंबाच्या सेवाभावी परंपरेचाही गौरव करण्यात आला. अक्कलकोटचे दानशूर कै. चनबसप्पा खेडगी व कै. शिवशरण खेडगी यांनी सुमारे सहा दशकांपूर्वी टँकरने पाणी वाटप, अन्नदान तसेच घटस्थापनेच्या काळात गोडे तेल वाटपाची परंपरा सुरू केली. ही परंपरा आजही खेडगी कुटुंबाची तिसरी पिढी पुढे नेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *