Headlines

निवडणूक आयोग म्हणजे पक्ष चोरणारी टोळी:ज्ञानेश कुमारांना थेट तुरुंगात टाका, महाराष्ट्र-बंगालमध्ये बॅलेट पेपरवर फेरनिवडणुका घ्या– उद्धव ठाकरे




निवडणूक आयोगातील (ECI) अंतर्गत वादाच्या बातम्या समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोग ही आता एक टोळी बनली असून, देशात लोकशाहीचा खून सुरू असल्याचा घणाघात त्यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेत बेईमानी केली असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये बॅलेट पेपरवर नव्याने निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. ईसीआय म्हणजे हैदोस घालणारी टोळी गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, “निवडणूक आयोगाचे काम एका टोळीसारखे सुरू आहे. ही टोळी संपूर्ण देशात हैदोस घालत असून, पक्ष फोडणे, पक्ष चोरणे आणि लोकशाहीचा खून करणे हेच त्यांचे काम आहे.” या संपूर्ण टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार असून, त्यांचा विद्रूप आणि भीषण चेहरा आता जगासमोर आला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ तुरुंगात टाकले पाहिजे, अशी संतप्त मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. पक्ष पळवले आणि बोगस मतदारांची घुसखोरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत आयोगाने दिलेल्या निकालांवर त्यांनी सडकून टीका केली. “पहिल्या पोटनिवडणुकीत आमचे नाव आणि चिन्ह गोठवले आणि नंतर कोणतीही शहानिशा न करता ते गद्दारांना दिले. तीच पद्धत शरद पवारांच्या पक्षाच्या बाबतीत वापरली गेली आणि आता तृणमूल काँग्रेससोबतही तेच सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. याशिवाय, मतदार याद्यांमधील गोंधळावर बोट ठेवत ठाकरे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर, विधानसभा निवडणुकीत तब्बल ४५ लाख बोगस मतदार यादीत नव्याने घुसडण्यात आले आहेत. ज्यांच्यामुळे हे आज सत्तेची गादी भोगत आहेत, त्या लालकृष्ण अडवाणी यांचेच नाव यादीतून वगळले गेले आहे. आपल्याला हवे ते मतदार ठेवायचे आणि नको ते वगळायचे, असा भयंकर प्रकार सुरू आहे.” ‘बॅलेट पेपर’वर फेरनिवडणुका घेण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा हस्तक्षेप केला असल्याचा आरोप करत, या तीनही राज्यांमधील निवडणुका तातडीने रद्द केल्या पाहिजेत, अशी मागणी ठाकरेंनी केली. तसेच, या राज्यांमध्ये पुन्हा नव्याने ‘बॅलेट पेपर’वर (मतपत्रिकेवर) निवडणुका घेण्यात याव्यात, असे ते म्हणाले. सुप्रीम कोर्ट आणि जनतेला साद ‘इंडियन एक्सप्रेस’मधील वृत्ताचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगात आता अंतर्गत लोकशाही राहिलेली नाही. ईसीआयचे इतर दोन आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरुद्ध थेट कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली आहे. हे धाडस दाखवल्याबद्दल ठाकरेंनी त्या दोन आयुक्तांचे जाहीर आभार मानले. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आणि नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करत, न्यायव्यवस्थेने या प्रकरणाची स्वतःहून (‘सुओ मोटो’) दखल घेण्याची मागणी त्यांनी केली. “जनता आता रस्त्यावर उतरली नाही आणि हा लोकशाहीचा खून मान्य केला, तर देशात अराजकता आल्याशिवाय राहणार नाही,” असा गंभीर इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ————- ही बातमी पण वाचा.. फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर: लातूरमध्ये 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ! पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून सरसकट मदतीचे आश्वासन, म्हणाले- पंचनामे कायदा म्हणून करावे लागतात राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या जाऊ गावात पोहचलेत. आता रब्बीसाठी शक्य ती मदत करू, बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *