![]()
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-2026’ चा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये अंधेरी (पश्चिम) येथील ‘स्वप्नाक्षय मित्र मंडळ’ यांनी प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवत पटकावला आहे. प्रथम पारितोषिक विजेत्या मंडळास ७५,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
घाटकोपर (पश्चिम) येथील ‘अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ’ (भटवाडीचा राजा) यांनी द्वितीय (रु. ५०,०००), तर करीरोड येथील ‘पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळा’ने तृतीय (रु. ३५,०००) पारितोषिकावर आपली मोहर उमटवली आहे. महानगरपालिका मुख्यालयात आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी या निकालाची अधिकृत घोषणा केली. पालिका जनसंपर्क खात्यातर्फे आयोजित या स्पर्धेचे हे ३७ वे वर्ष होते. नागरी सेवा-सुविधा, पर्यावरणपूरकता आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या ५० प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा यात सहभाग घेतला होता.
बीएमसीची ‘श्रीगणेश गौरव स्पर्धा-२०२६’ अंधेरीचे ‘स्वप्नाक्षय मित्र मंडळ’ मुंबईत प्रथम! घाटकोपरचा ‘भटवाडीचा राजा’ द्वितीय करीरोडचे ‘पंचगंगा मंडळ’ तृतीय
कांजूरमार्गच्या शिवशक्ती मंडळाची गणेशमूर्ती ठरली सर्वोत्कृष्ट शाडूची मूर्ती
विविध श्रेणींमधील विशेष विजेते: सर्वोत्कृष्ट शाडूची मूर्ती: शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरमार्ग (पारितोषिक रु. २५,०००) सर्वोत्कृष्ट मूर्तिकार: श्री. मयेकर (बाळ गोपाळ मित्र मंडळ ‘मुंबईचा पेशवा’, विलेपार्ले पूर्व – रु. २५,०००) सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावट): श्रीमती रेश्मा शिंदे (विघ्नहर्ता रहिवासी मित्र मंडळ ‘चंपाभुवनचा विघ्नहर्ता’, बोरिवली पूर्व – रु. २०,०००) अवयवदान जागृती पुरस्कार: बालमित्र कला मंडळ, विक्रोळी पश्चिम (रु. १५,०००) पर्यावरण जनजागृती पुरस्कार (प्रत्येकी रु. १०,०००)
१. श्री श्रद्धा मित्र मंडळ ट्रस्ट, दहिसर पूर्व
२. शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दादर उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु. १०,०००)
१. बेस्ट नगर श्रीगणेशोत्सव मंडळ, गोरेगाव पश्चिम
२. युवक उत्कर्ष मंडळ, मालवणी मालाड परीक्षण अन् निकष
१७ ते २० सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या प्राथमिक व अंतिम फेऱ्यांचे परीक्षण कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील ९ तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीने केले. देखाव्याचा विषय, पर्यावरणपूरकता, देखाव्याची मांडणी, परिसर स्वच्छता आणि पालिकेच्या उपक्रमांमधील सहभाग या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली. याशिवाय, धारावी, परळ, साकीनाका आणि भांडुप यांसारख्या विविध भागांतील १४ सार्वजनिक मंडळांना त्यांच्या सामाजिक व कलात्मक योगदानासाठी विशेष प्रशस्तीपत्रके जाहीर करण्यात आली आहेत.
Source link
बीएमसीची ‘श्रीगणेश गौरव स्पर्धा-2026:अंधेरीचे 'स्वप्नाक्षय मित्र मंडळ' मुंबईत प्रथम!