Headlines

लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून शिधापत्रिका घ्यावी:पुरवठा निरीक्षक जान्हवी पानसे यांचे आवाहन




लाभार्थ्यांनी शिधापत्रिका व इतर कामांसाठी कार्यालयात गर्दी करण्याऐवजी ऑनलाईन अर्ज सादर करून शिधापात्रिका व इतर योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुरवठा निरीक्षक जान्हवी पानसे यांनी येथे व्यक्त केले. यावेळी पानसे यांनी पुरवठा विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. शिधापत्रिका काढण्यासाठी शासनाने आरसीएमएस ही ऑनलाईन व्यवस्था सुरु केली आहे. यामध्ये नागरिकांना नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, नाव वाढवणे किंवा कमी करणे, नाव, पत्ता दुरुस्ती, डुप्लिकेट शिधापत्रिका काढता येणार आहे. लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेवरील नाव, कुटुंबातील सदस्य, आधार लिंकिंग, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का, हे वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या अंत्योदय योजनेत कुटुंबाला प्रतिशिधापत्रिका दरमहा ३५ किलो अन्नधान्य मिळण्याची तरतूद आहे. तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती दरमहा ५ किलो अन्नधान्य मिळते. डीबीटी योजनमध्ये धान्याऐवजी पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाते. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी आपले आधार-बँक खाते लिंकिंग आणि बँक खाते सक्रिय आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. शिवभोजन योजनेेत गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात पौष्टिक भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. स्थलांतरित कुटुंबांना त्यांच्या स्थलांतराच्या ठिकाणी धान्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे स्थलांतरीत कुटुंबांना याची माहिती असणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *