Headlines

भगवान परशुरामांच्या विचारांचा वारसा जपावा:आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत केले अभिवादन




‘भगवान परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारे ऋषी म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा चालविण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे,’ असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे. भगवान परशुराम यांची जयंती दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला साजरी केली जाते. त्यानिमित्त येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत त्यांच्यासह विधान परिषद सदस्य संजय खोडके व इतर मान्यवरही सहभागी झाले होते. आमदार खोडके पुढे म्हणाल्या, भगवान परशुरामांनी भगवान शिवशंकरांची कठोर तपश्यचर्या करुन अनेक दिव्य अस्त्रे आणि विद्या आत्मसात केल्यात. परशुराम हे ” अष्टचिरंजीवी ‘ पैकी ( अमर ) एक मानले जातात. त्यांचे मूळ नाव ‘ राम ‘ होते, परंतू भगवान शिवाने दिलेला ‘परशु ‘ या शस्त्रामुळे त्यांना ‘ परशुराम ‘ ( परशु धारण करणारे राम ) म्हटले गेले. भगवान परशुराम हे हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत असून, त्यांना भगवान विष्णुचा सहावा अवतार मानले जाते. ते माता रेणुका आणि ऋषी जमदग्नी यांचे चिरंजीव होते. ज्यांनी पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून ती आज्ञापालन करण्यासाठी कठोर पाऊल उचलले होते, अशी कथा सांगितली जाते. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्तची शोभायात्रा ज्यावेळी राजकमल चौकात आली, त्यावेळी खोडके दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. आमदार सुलभा खोडके व आमदार संजय खोडके यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस वंदन – पूजन – नमन करीत माल्यार्पण केले. भगवान परशुराम, गोमातेच्या सन्मानार्थ काढलेल्या शोभायात्रेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, श्री गौरक्षण संस्था, श्री गौ सन्मान रक्तदान समिती, श्री माहेश्वरी पंचायत, श्रीरामचरितमानस परिषद, अमरावती रक्तदान समिती आणि आयोजनातील इतर समित्यांचे पदाधिकारी व सदस्ये या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *