Headlines

महायुतीचा धर्म कोणी किती पाळला हे आम्हाला माहीत:संजय केनेकरांचा मित्रपक्षावर घणाघात आणि पदवीधरच्या जागेवर दावा




मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागेवरून रस्सीखेच सुरू होण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकीत ही जागा भाजपनेच लढावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते संजय केनेकर यांनी मित्रपक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मित्रपक्षांनी महायुतीचा धर्म किती पाळला हे आम्हाला माहीत आहे,’ असा टोला लगावत त्यांनी मागील निवडणुकांतील मित्रपक्षाच्या कार्यपद्धतीबाबतची उघड नाराजी व्यक्त केली आहे. २ लाखांहून अधिक नोंदणी भाजपचीच संजय केनेकर यांनी आकडेवारीचा दाखला देत या मतदारसंघावर भाजपचा हक्क असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “सध्या या मतदारसंघासाठी सरकार दरबारी २ लाख ९० हजारांपर्यंत नोंदणी दर्शवली जात आहे. यापैकी जवळपास २ लाखांची नोंदणी एकट्या भारतीय जनता पार्टीने केली आहे. हा आमचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने तो भाजपकडेच असला पाहिजे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची ठाम भूमिका आहे. यासाठी पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडेही रीतसर मागणी करण्यात आली आहे.” ‘महायुतीचा धर्म न पाळल्याने कार्यकर्त्यांत चीड’ सध्या महायुतीमध्ये ही जागा विद्यमान आमदारांकडे (मित्रपक्षाकडे) असली तरी, भाजप कार्यकर्त्यांचा याला विरोध का आहे, यावर केनेकर यांनी स्पष्टीकरण दिले. “महायुतीमधून जे लढायला येतील, त्यांनी पूर्वी किती महायुतीचा धर्म पाळला, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. ज्यावेळी पक्षाने किंवा महायुतीने आदेश दिलेले असतात, तेव्हा ते प्रत्येकाने पाळणे अपेक्षित असते. आमचा कार्यकर्ता श्रेष्ठींचे आदेश नेहमीच पाळतो. परंतु, महायुतीने घेतलेले निर्णय जेव्हा काही नेते पाळत नाहीत, तेव्हा साहजिकच कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण होते,” अशा शब्दांत त्यांनी मित्रपक्षाच्या जुन्या वर्तनावर थेट बोट ठेवले. ‘पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहील’ या सर्व दाव्यांनंतर आणि नाराजी व्यक्त केल्यानंतरही पक्ष शिस्तीबाबत केनेकर यांनी पक्षाची अधिकृत आणि स्पष्ट भूमिका मांडली. “जर हा मतदारसंघ मित्रपक्षाला सुटला, तर तुम्ही त्यांचे काम करणार का?” या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना केनेकर म्हणाले की, “जागावाटपाचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा आहे. आमचा पक्ष ज्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास सांगेल, त्यालाच आम्ही मतदान करू असे सांगितले. हेही वाचा.. छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून वाद:गणेशभक्त-पोलिसांमध्ये बाचाबाची; मारहाणीत एक जखमी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात काल विसर्जन मिरवणुकांचा मोठा उत्साह पाहायला मिळला. मात्र, या उत्साहाला गालबोट लागणारी एक घटना समोर आली आहे. गुलाल उधळण्याच्या कारणावरून पोलिस आणि गणेश भक्तांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेत एक गणेश भक्त जखमी झाला असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *