Headlines

पुण्यात 40 वर्षीय महिलेवर अत्याचार:शेजारी राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला अटक, 12 सप्टेंबरची घटना




विश्रांतवाडी परिसरात ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५२ वर्षीय कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली. जयसिंग भानुदास साठे (रा. श्रमिकनगर, विश्रांतवाडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित महिला शेजारी राहत असून त्यांच्यात कोणतेही नाते नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त राजनिकांत चिलुमुला यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला २२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना तिच्यावर १२ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून साठे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ३५१(२) तसेच पोक्सो कायद्यानुसार कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली. प्राप्त वैद्यकीय अहवाल तसेच फिर्यादी आणि पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार बीएनएस कलम ६५(२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, १२ आणि १८ अंतर्भूत करण्यात आले असून, त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येत आहे. आरोपी साठे हा पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी म्हणून काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नगर रस्त्यावर अपघातात महिलेचा मृत्यू टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. गीता रवींद्र चव्हाण (वय ३८, रा. कोलते पार्क, कावडे वस्ती, वाघोली, अहिल्यानगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मयत यांचा मुलगा समर्थ (वय १८) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार समर्थ आणि त्याची आई गीता हे अहिल्यानगर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी वाघोली परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात गीता गंभीर जखमी झाल्या. दुचाकीस्वार समर्थ फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारांपूर्वीच गीता यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर टेम्पो चालकाला पोलिसंनी ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक महेश गळगटे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *