Headlines

निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, बिग बॉस फेम दिव्या शिंदेला अटक:पाच लाखांची मागणी करत घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी 30 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी




बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेला अटक; निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी पुणे : प्रतिनिधी ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री दिव्या सुनील शिंदे हिला निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण करून पाच लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून काळेपडळ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दिव्या शिंदेला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमित शेटे करीत आहेत. दिव्या शिंदे (वय २५, रा. सनसिटी, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. विदाधर गायकवाड हे सदस्य असलेल्या करुणादीप संस्थेच्या वतीने २ ते ३ सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दिव्या शिंदे सहभागी झाली होती. मात्र, तिच्याकडे कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण नसल्याचा दावा करण्यात आला आहे. कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर दिव्या शिंदे हिने डॉ. गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर ती अन्य दहा जणांसह गायकवाड यांच्या घरी गेली. तेथे कथितरीत्या तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी डॉ. गायकवाड यांच्या तक्रारीवरून दिव्या शिंदेसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिव्याला अटक करून न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, दिव्याकडून अन्य आरोपींची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्रमाचे पैसे देण्यासंदर्भातील कथित लेखी नोट आणि आरोपीच्या हस्ताक्षराचा नमुना तपासासाठी आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत दिव्या शिंदेला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *