![]()
दिवाळी आणि दसऱ्यादरम्यान गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे १०२ फेस्टिव्ह स्पेशल गाड्या चालवणार आहे. आजपासून या विशेष गाड्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये प्रवास करण्यासाठी विशेष शुल्क आकारले जाईल. १० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान धावणाऱ्या या विशेष गाड्या मुंबई, चेन्नई, लातूर, कोल्हापूर आणि कलबुर्गी यांसारख्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवतील. या गाड्यांसाठी IRCTC अॅप आणि अधिकृत वेबसाइट (irctc.co.in), रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर तसेच RailOne अॅपद्वारे तिकीट बुक करता येईल. मुंबई-चेन्नई साप्ताहिक विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई ते चेन्नईदरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन धावेल. ही ट्रेन 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान दोन्ही दिशेने प्रत्येकी 6 फेऱ्या करेल. चेन्नई बीचहून CSMT मुंबई विशेष ट्रेन दर गुरुवारी पहाटे 4 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता मुंबईला पोहोचेल. CSMT मुंबई-लातूर ही ट्रेन मुंबई आणि लातूरदरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावेल. ही ट्रेन 13 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबरदरम्यान दोन्ही दिशेने प्रत्येकी 13 फेऱ्या करेल. CSMT मुंबई-लातूर विशेष ट्रेन दर मंगळवारी आणि गुरुवारी रात्री 12:35 वाजता मुंबईहून रवाना होईल आणि त्याच दिवशी सकाळी 11:40 वाजता लातूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात लातूर-CSMT मुंबई विशेष ट्रेन त्याच दिवशी संध्याकाळी 16:30 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे 4:10 वाजता मुंबईला पोहोचेल. कोल्हापूर-कलबुर्गी विशेष ही ट्रेन कोल्हापूर आणि कलबुर्गी दरम्यान शुक्रवार वगळता आठवड्यातून ६ दिवस धावेल. ही दोन्ही दिशांनी ३२-३२ फेऱ्या करेल. कोल्हापूर-कलबुर्गी विशेष ट्रेन १० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान सकाळी ०६:१० वाजता कोल्हापूरहून रवाना होऊन सायंकाळी १६:१० वाजता कलबुर्गीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन कलबुर्गीहून सायंकाळी १८:१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:४० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
Source link
दिवाळी-दसऱ्यानिमित्त 102 फेस्टिव्हल स्पेशल गाड्या धावणार:आजपासून तिकिटांचे आरक्षण सुरू; वेळ आणि मार्गांची माहिती जाणून घ्या