Headlines

कन्नड येथे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात‎:युवकांनी डिजिटल युगात पारंपरिक खेळांना‎प्राधान्य द्यावे- पोलिस अधिकारी आरती पवार‎




देशी मैदानी खेळ आपल्याला समृद्ध वारसा म्हणून मिळाले आहेत. आजच्या नवयुवकांनी डिजिटल युगात आपल्या या पारंपरिक व देशी खेळांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन परिक्षाविधीन उपविभागीय पोलिस अधिकारी आरती पवार यांनी केले. तालुका क्रीडा स्पर्धेअंतर्गत आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कन्नड येथे २०२६-२७ या वर्षातील तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती पवार यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दिंडे, गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, क्रीडा संयोजक मुक्तानंद गोस्वामी, तसेच क्रीडा मार्गदर्शक प्रवीण शिंदे व अविनाश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांत एकूण ९४ विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपले कसब दाखवले. या सामन्यांचे पंच म्हणून गोपाल बमनावत यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्याम खोसरे, कडूबा चव्हाण, सचिन शेळके व भगवान म्हैसमाळे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन करण राठोड यांनी मानले.यावेळी विविध वजनी गटातील खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विविध शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांची आता पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. १४ वर्षांखालील गटाचे प्राथमिक निकाल जाहीर ३५ किलो वजन गटात वसंत चव्हाण साने गुरुजी विद्यालय, कन्नड, ३८ किलो वजन गट हेमंत विठ्ठल राठोड नवजीवन आश्रमशाळा, आंबा तांडा, ४४ किलो वजन गट प्रेम किरण इंगळे कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय, ४८ किलो वजन गट अर्जुन गणेश नरोटे श्री गणेश विद्यालय, देवगाव रंगारी यांनी यश मिळवले. स्पर्धेतील सर्व यशस्वी मल्लांचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसींग राजपूत आणि नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांनी अभिनंदन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *