Headlines

टोमॅटो उत्पादकांच्या थकबाकीसाठी बाजार समितीला ठोकले कुलूप:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने बाजार समिती कार्यालय ठप्प‎




कन्नड तालुक्यातील पाणपोई टोमॅटो मार्केटमधील शेतकऱ्यांच्या १ कोटींहून अधिक रुपयांच्या थकबाकी प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी दि.२८ बाजार समितीच्या कार्यालयास कुलूप ठोकले. यामुळे सोमवारी दि. २८ रोजी चार तास आंदोलनाने बाजार समिती कार्यालय ठप्प झाले होते. वर्षांपासून सुमारे एक कोटी रुपये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकले आहे. बाजार समितीच्या निष्क्रिय कारभारामुळेच शेतकऱ्यांची ही लूट झाल्यामुळे आंदोलन केले. शेतकरी पैसे मागायला गेले की, “हे मार्केट प्रायव्हेट व्यापारी संकुल आहे, आमचा संबंध नाही” असे थातूरमातूर कारण सांगून संचालक मंडळ हात झटकत आहे. शिवाय, जुन्या १ कोटीच्या थकबाकीचा हिशोब न लावताच त्याच जागेवर २२ व्यापाऱ्यांना बसवून बेकायदेशीर १४ कलमी नियम पत्र काढणे, म्हणजे जुन्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. जुन्या घोटाळ्यावर पांघरूण शेतकरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *