Headlines

रस्त्यांची बिले आली; अध्यक्षांनी केला ‘पंचनामा’‎:टिकाव-फावडा घेऊन थेट कामांवर, वैजापुरातील 12 रस्त्यांची तपासणी‎




दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या मातोश्री शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांची देयके मिळण्याची वेळ आली असतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तपासणी सुरू केल्याने या कामांना नवे वळण मिळाले आहे. टिकाव-फावडा घेऊन पंचायत समितीचे अभियंते आणि रोजगार हमी योजनेच्या सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यांना सोबत घेत रस्ते खोदून कामाचा दर्जा तपासण्यास सुरुवात केली आहे. वैजापूर तालुक्यातील १२ कामांचे अशा पद्धतीने पंचनामे केले जात असून, मोजमाप पुस्तिकेत दाखविल्याप्रमाणे प्रत्यक्ष काम आढळले तरच देयके दे ण्याची भूमिका अध्यक्षांनी घेतली आहे. ही कामे २०२३-२४ मध्ये मंजूर झाली होती. तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यकाळात आमदार रमेश बोरणारे यांनी या रस्त्यांसाठी पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. आता भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष गलांडे यांनी याच कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी सुरू केल्याने या प्रशासकीय कारवाईला राजकीय संदर्भही जोडला गेला आहे. दोन वर्षांनंतर निधी उपलब्ध होऊन प्रलंबित देयकांचा मार्ग मोकळा होत असतानाच ‘आधी रस्ता तपासा, मगच देयक’ या भूमिकेमुळे संबंधित कामे कसोटीवर आली आहेत तपासणी की राजकीय वर्चस्व?’ दबक्या आवाजात चर्चा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *