Headlines

महिला सक्षमीकरणासाठी शेतीपूरक उद्योगांना चालना:‘सम्यक गती महिला शेतकरी’च्या सभेत निर्णय‎




उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सम्यक गती महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, घोटी प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांना बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग व लघुउद्योगांना चालना देण्याचा निर्धार करण्यात आला. सभेला घोटी प्रभाग संघातील सुमारे ५०० महिला सभासद उपस्थित होत्या. इगतपुरी तालुका आदिवासीबहुल असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचे यावेळी ठरले. महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना बांधकाम कामगार तालुकाप्रमुख अशोक सुरुडे होते. सभेत कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नवीन सभासद वाढविणे, सुरू असलेल्या उपक्रमांना गती देणे आणि अधिकाधिक महिलांना उद्योग-व्यवसायाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या अध्यक्षा सविता रमेश हेमके, सचिव मयुरा अशोक सुरुडे, कोषाध्यक्ष पूजा विनोद परदेशी, संचालक योगिता संतोष लहामगे, माया ज्ञानेश्वर शिंदे, आशा भोसले आदी उपस्थित होते. महिला सक्षमीकरणातून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *