Headlines

ठाणगावी भोर विद्यालयात शिक्षक, गुणवंतांचा गौरव:कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रथ मिरवणुकीसह विविध पथकांचे सादरीकरण‎



येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

.

अध्यक्षस्थानी नाशिक मनपाचे मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल मच्छिंद्र शिरसाट, इंजि. मुकुंद काकड, मुंबईचे नगरसेवक प्रकाश जंगधरे, श्याम वालझाडे, नयन केदार, सुजलान कंपनीचे संदीप कोल्हे, मुख्याध्यापक काशिनाथ तळपाडे उपस्थित होते. ग्रामपंचायतीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार बाळू शंकर भांगरे व शिवाजी सोमनाथ वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. दहावी-बारावीतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना पानसरे, भोर, शिरसाट व कुशारे परिवारांतर्फे रोख पारितोषिके देण्यात आली. गुरु साई मित्रमंडळाने ३९ ट्रॉफींचे योगदान दिले. जनसेवा संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर यांच्या हस्ते २५ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वाटप करण्यात आल्या.

यावेळी अरुण केदार, गणेश शिंदे, सागर शिंदे, बबन काकड, सचिन रायजादे, विलास मोरे यांसह ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल चव्हाण यांनी केले, तर आभार शहाजी सातव यांनी मानले. भोर विद्यालयात बोलताना नाशिक मनपाचे अग्निशामक मुख्य अधिकारी संजय बैरागी. समवेत मान्यवरांसह विद्यार्थी.

शाळा विकासासाठी मदतीचा हात शाळा विकासासाठी संजय बैरागी यांनी १ लाख ११ हजार, श्याम वालझाडे यांनी १ लाख, प्रकाश जंगधरे यांनी ५१ हजार, भाऊसाहेब त्र्यंबक शिंदे यांनी ५१ हजार व संजय शिंदे यांनी २१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *