![]()
येथील बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला ‘लोकनेते अजितदादा पवार प्रशासकीय इमारत’ असे नामकरण करण्याचा ठराव बाजार समितीच्या वतीने करण्यात आला. या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते बाजार समितीच्या सभापती सिंधुताई सोनवणे, उपसभापती हरीभाऊ जाधव व संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बागलाणसह राज्यातील शेतकरी आणि सहकार क्षेत्रासाठी अजित पवार यांनी दिलेल्या योगदानाची स्मृती चिरंतन राहण्याच्या दृष्टीने बाजार समिती संचालक मंडळाने घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले. बागलाण तालुक्याशी अजित पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तालुक्याच्या विकासासह ग्रामीण भागातील सहकार चळवळ आणि शेतकरी वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे असल्याचे सोनवणे यांनी मनोगतात सांगितले. बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाचा सत्कार करून नामकरणाच्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी फईम शेख, पांडुरंग सोनवणे, किशोर ह्याळीज, रामदास सोनवणे, संदीप भामरे, भारत खैरनार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
सटाणा बाजार समिती प्रशासकीय इमारतीला अजित पवारांचे नाव:नामकरणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून संचालक मंडळाचा सत्कार