Headlines

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 2 दिवस 3 तास बंद:23 आणि 24 एप्रिल रोजी शटरिंग काढण्यासाठी वाहतूक वळवली जाईल




यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील वाहतूक 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी प्रत्येकी तीन तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) येथील पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाहतूक थांबवण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत, सर्व वाहने किवळे – देहूरोड – तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळवण्यात येतील. त्याचप्रमाणे, पुण्याकडे येणारी वाहतूक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येईल. वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. या कालावधीत वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास, त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जप्त वाहनांचा २८ एप्रिल रोजी जाहीर लिलाव राज्य उत्पादन शुल्क विभाग, तळेगाव दाभाडे (पुणे) व महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत एकूण ०२ ट्रक कंटेनर, २० चारचाकी वाहने व २५ दुचाकी वाहने यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी उत्तम आव्हाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे पुणे येथे संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *