Headlines

शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन- ॲड. शिंदे:आजच्या युवकांनी कौशल्याधिष्ठीत शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास साधण्याची गरज- पवार‎




सामाजिक परिवर्तनाचे माध्यम म्हणजे शिक्षण होय. याची आत्मजाणीव कर्मवीरांना होती म्हणूनच त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण कर्मवीरांमुळेच झाली. कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचे वारसदार होते. आजचे रयतमधील शिक्षक हे कर्मवीरांचा विचार वारसा जोपासत आहेत. रयत शिक्षण संस्था ही काळाबरोबर बदलणारी संस्था आहे, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी व्यक्त केले. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रयत संकुलाच्यावतीने आयोजित केलेल्या कर्मवीर जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते. मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बाबासाहेब भोस म्हणाले, रयत शिक्षण संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. कर्मवीरांच्या त्यागाला विसरू नका. विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. ते म्हणाले, रयत ही माणसं घडवणारी संस्था आहे. कर्मवीरांचा विचार वारसा या रयतेमधूनच जोपासला जातो. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी केले. श्रीमंत राजमाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रयत गीत सादर केले. याप्रसंगी गणेश भोस यांची जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. देवेंद्र बहिरम यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी संपादित केलेल्या भगीरथ नियतकालिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल वाचन प्राचार्य दिलीप भुजबळ, मुख्याध्यापिका वर्षा भोईटे यांनी केले. श्रम प्रतिष्ठा दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला. तसेच रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पुष्प सजावट स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन डॉ. देवेंद्र बहिरम, प्रा. संजय फटे, प्रा. संदीप दरेकर यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांनी मानले. सुभाष गांधी, कुंडलिक दरेकर, तुकाराम कन्हेरकर, महावीर पटवा, रवी दंडनाईक, रत्नप्रभा बोरुडे, ज्योत्स्ना भंडारी, संजय मचे, मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर, डॉ. ज्ञानदेव भोसले आदी उपस्थित होते. युवकांना कौशल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज प्रमुख वक्ते म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार यांनीही विचार व्यक्त केले. ते म्हणाले, कर्मवीरांनी शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या विकासाचे काम केले. आजच्या युवकांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करावा असे विचार त्यांनी विचार मांडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *