![]()
छातीत दुखत असल्यास ती केवळ ‘ॲसिडिटी’ आहे, असा स्वतःच अंदाज लावून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यानंतर घरीच औषधे घेणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे अनेकदा हृदयाच्या आजाराला ॲसिडिटीचे दुखणे समजून दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच जवळच्या रुग्णालयात जाऊन ईसीजी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्ला हृदयतज्ज्ञांनी जागतिक हृदयरोग दिनानिमित्त दिला. उपचाराचा पर्याय निवडण्यात विलंब ठरतोय घातक हार्ट अटॅकच्या स्थितीत रुग्णालयात पोहोचल्यानंतर थ्रोम्बोलायसिस किंवा अँजिओप्लास्टी यांपैकी कोणता पर्याय निवडायचा, यावर नातेवाईक फोन करण्यात व विचारपूस करण्यात 1 ते दीड तास वाया घालवतात. ‘टाइम इज मसल’ या तत्त्वानुसार जितका वेळ वाया जातो, तितके हृदयाचे स्नायू अधिक बाधित होतात. रुग्णाचा जीव जाण्याचा धोका वाढतो. सध्या डॉक्टर व समाजात विश्वासाची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये ‘डिफेन्सिव्ह प्रॅक्टिस’ वाढीस लागली आहे. त्याचा अंतिम फटका रुग्णांना बसतो. त्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांशी उत्तम संवाद साधावा. डॉ. आनंद निकाळजे, एमजीएम हॉस्पिटल महिलांमध्ये मेनोपॉजनंतर हृदयरोग्याचे वाढते प्रमाण महिलांमध्ये मासिक पाळी सुरू असेपर्यंत इस्ट्रोजेन संप्रेरकांमुळे (हार्मोन) हृदयाचे संरक्षण होते. मात्र मेनोपॉजनंतर २ ते ३ वर्षांत पुरुषांइतकाच धोक्याचा स्तर वाढतो. महिलांमध्ये छातीत दुखण्याऐवजी केवळ श्वास लागणे किंवा अचानक भरपूर घाम येणे, अशी ऑटिपिकल (विशिष्ट नसलेली) लक्षणे दिसतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेची डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे आवश्यक आहे. डॉ. श्रद्धा रुणवाल, इद्यम हार्टकेअर हॉस्पिटल दम लागण्याकडे दुर्लक्ष नको दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हा केवळ फुफ्फुसांचा दमा आहे, किंवा ॲनिमिया (रक्ताल्पता) आहे, असे न समजता ते हृदयाशी संबंधित आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. किमान एकदा तरी हृदयतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. डॉ. महेंद्रसिंग परिहार, प्राईम हार्ट केअर हॉस्पिटल जीवनशैलीतील बदल अडचणीचे जीवनशैली आणि स्व-औषधोपचार ही बाब अडचणीची ठरू शकते. या बरोबरच तरुणांमध्ये रात्री उशिरापर्यंत रील्स पाहणे, अपुरी झोप, ताणतणाव, स्वतःच्या मनाने औषधे सुरू किंवा बंद करण्याची (सेल्फ मेडिकेशन) सवय अत्यंत घातक ठरत आहे. डॉ. सुमीत शेजुळ, मेडिकव्हर हॉस्पिटल शासकीय योजनांचा ‘आधार’ ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनां’तर्गत हृदयरोग्याचे उपचार समाविष्ट आहेत. आणीबाणीच्या वेळी उपचारात अडथळा येऊ नये म्हणून आधार कार्ड आणि रेशन कार्ड ऑनलाइन लिंक असणे आवश्यक आहे. डॉ. विक्रांत देशमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल छातीत आग अन् ॲसिडिटीचा भ्रम ‘ॲसिडिटीमुळे छातीत दुखणे आणि हार्ट अटॅकची लक्षणे यांत फरक करणे अनेकदा कठीण जाते. छातीतील प्रत्येक दुखणे ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका. वेळेवर ईसीजी केल्यास हृदयाची स्थिती स्पष्ट होते. त्वरित योग्य उपचार मिळतात. डॉ. देवेंद्र बोरगावकर, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल रुग्णालयात जाण्यास वेळ मिळतो छातीत तीव्र कळ आल्यास, किंवा त्रास झाल्यास, रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा वेळ मिळावा म्हणून इकोस्पिरिन 300 मिग्रॅ, क्लोपिडोद्रे ल 300 मिग्रॅ दिल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया मंदावते. रुग्णालयात पोहोचण्यासाठी वेळ मिळतो. डॉ. अमोल पाटील, महावीर हॉस्पिटल आमचे ‘हार्ट फेल्युअर क्लिनिक’ हृदयरोग रुग्णांना सातत्यपूर्ण आणि शास्त्रीय वैद्यकीय मदत मिळावी यासाठी एमआयटी हॉस्पिटल येथे विशेष ‘हार्ट फेल्युअर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. रुग्णांसाठी हे क्लिनिक अत्यंत फायदेशीर ठरत आहे. ज्ञानेश्वर चेके, एमआयटी हॉस्पिटल तरुणांमध्ये हृदयरोग व बीपीचा धोका वाढण्याची मोठी समस्या पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये जनुकिय घटकांमुळे मधुमेह (डायबीटिस) आणि उच्च रक्तदाबाचे (हायपरटेन्शन) प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे बीपीचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर आढळणारा हा आजार आता तिसाव्या वयोगटातील रुग्णांमध्येही दिसून येत आहे. त्याचे गंभीर परिणाम दिसत आहेत.डॉ. कुलदीप तोतावार, मेडिकव्हर हॉस्पिटल योग्य वेळेत उपचार घेणे गरजेचे, धोका लक्षात घेता घ्या काळजी हार्ट फेल्युअर हा सध्याच्या काळात अत्यंत सामान्य आजार बनला आहे. उपचारात दुर्लक्ष झाल्यास, किंवा योग्य वेळी काळजी न घेतल्यास, रुग्णांमध्ये ‘सडन कार्डियाक डेथ’ (अचानक मृत्यू) होण्याचा मोठा धोका असतो. योग्य आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्णांना या आजाराच्या लक्षणांपासून पूर्णपणे आराम मिळू शकतो. त्यांचे आयुष्य वाढवणे शक्य होते.डॉ. गणेश सपकाळ, ओमसाई रुग्णालय डॉक्टरांनी दिलेले महत्त्वाचे सल्ले
Source link
जागतिक हृद्यरोग दिनानिमित्त दिव्य मराठी टॉक शो:ॲसिडिटी समजून छातीतील दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, ईसीजी काढल्यास समजेल आजार