![]()
नागपूरमध्ये गुन्हे शाखा युनिट-३ आणि सायबर पथकाने आंतरराज्यीय टोळीतील सात जणांना ताब्यात घेतले. या टोळीने लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २० लाख रुपयांची फसवणूक केली. दुबईतील हवाल्याशी या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून १८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात १५ लाखांची चारचाकी, १ लाख ६० हजार रुपयांच्या दोन दुचाकी, १ लाख ७० हजार रुपयांचे आठ मोबाइल फोन आणि १५ हजार रुपये रोख रक्कम आहे. फिर्यादीला अनोळखी व्यक्तीने फोन करून भारतात लग्न करण्याचे आमिष दाखवले. सोन्याचा व्यवसाय असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. नंतर दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने पकडल्याचे सांगत सुटकेसाठी पैसे मागितले. अशाप्रकारे त्याच्याकडून सुमारे २० लाख रुपये उकळले.
Source link
लग्नाचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक:7 जण ताब्यात, दुबई हवाला कनेक्शनची शक्यता; 18.45 लाखांचा मुद्देमाल जप्त