![]()
मोर्शी तालुक्यातील कोळविहीर येथे एका ३८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जाला कंटाळून एकनाथ गोवर्धन गतफणे यांनी २९ सप्टेंबर रोजी स्वतःच्या शेतात विष प्राशन केले. एकनाथ गतफणे यांच्याकडे १८ एकर वडिलोपार्जित शेती होती. त्यांनी बँक आणि खाजगी कर्ज घेऊन सोयाबीन, कापूस, तूर पिकांची लागवड केली होती. मात्र, पावसाअभावी सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. पिके हातातून गेल्याने कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते होते. या निराशेपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. शिरखेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चांदुर बाजार ग्रामीण रुग्णालयात पाठवला. ३० सप्टेंबर रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा आहे.
Source link
कोळविहीरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या:नापिकी आणि कर्जामुळे शेतातच विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा