![]()
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशीही एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही. मात्र, दोन दिवसांत ३९ उमेदवारांनी एकूण ८४ अर्जांची उचल केली. बुधवारी १९ उमेदवारांसाठी ४० अर्जांची उचल झाली. मंगळवारी २० उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले. उमेदवारी अर्ज विनामूल्य दिले जात आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंती, ४ ऑक्टोबरला रविवारची सुटी असेल. खुल्या प्रवर्गासाठी १० हजार, तर राखीव प्रवर्गासाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात होईल. उमेदवारी अर्ज ९ ऑक्टोबरपर्यंत मागे घेता येतील. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होईल. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपत असल्याने निवडणूक आयोगाने ही घोषणा केली. विभागीय आयुक्त नयना गुंडे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
Source link
अमरावती शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या दिवशीही एकाही उमेदवाराने नामांकन भरले नाही:आतापर्यंत 39 उमेदवारांसाठी 84 अर्जांची उचल; 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार