![]()
‘एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ (EFSL/कंपनी) ने सुरक्षित आणि परतफेड होणारे ‘अपरिवर्तनीय डिबेंचर्स’ (NCD/कर्जरोखे) विक्रीसाठी बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. प्रत्येक डिबेंचरचे दर्शनी मूल्य 1,000 रुपये आहे. या रोखेविक्रीतून कंपनी 150 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. मूळ रकमेपेक्षा जास्त मागणी आल्यास अर्थात ग्रीन श्यू पर्यायांतर्गत अतिरिक्त 150 कोटी रुपयांपर्यंतचा निधी स्वीकारला जाणार आहे. मूळ रक्कम आणि अतिरिक्त पर्याय असे दोन्ही मिळून कंपनी या रोखेविक्रीतून एकूण 300 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारू शकणार आहे. या योजनेत 10 वेगवेगळ्या मालिका गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांना निश्चित व्याजदर लागू राहणार आहे. सदर डिबेंचर 24 महिने, 36 महिने, 60 महिने आणि 120 महिने या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. वार्षिक, मासिक आणि मुदतीअंती एकत्रित असे व्याजाचे 3 पर्याय राहणार आहेत. या अपरिवर्तनीय डिबेंचर्सवर मिळणारा प्रभावी वार्षिक परतावा दरवर्षी 8.64% ते 10.00% या दरम्यान आहे. ही योजना सोमवार, 21 सप्टेंबर 2026 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 5 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होईल. या योजनेद्वारे उभारलेल्या एकूण निधीपैकी किमान 75% रक्कम ही कंपनीच्या सध्याच्या कर्जांचे हप्ते (मुद्दल) आणि त्यावरील व्याज फेडण्यासाठी वापरली जाईल. उरलेली जास्तीत जास्त 25% रक्कम कंपनीच्या इतर सामान्य कामकाजासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. अर्थात हा सर्व व्यवहार वेळोवेळी सुधारित केलेल्या भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (अपरिवर्तनीय प्रतिभूतींचे इश्यू आणि लिस्टिंग) विनियम, 2021 (“SEBI NCS विनियम”) च्या अनुपालनानुसार केला जाणार आहे. या इश्यू अंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या NCD ना “CRISIL A+/Stable”(“क्रिसिल ए प्लस रेटिंग” विथ स्टेबल आउटलूक) असे मानांकन देण्यात आले आहे. ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड# आणि टिपसन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक (Lead Managers) आहेत. गुंतवणूकदारांना तरलता (Liquidity) प्रदान करण्यासाठी या NCD BSE Limited वर सूचीबद्ध केल्या जातील.
Source link
आता FD वर 10% पर्यंतचा परतावा!:एडेलवाईस कंपनी घेऊन आलीय 300 कोटींचा मोठा धमाका; पाहा कशी कराल गुंतवणूक?