Headlines

Mumbai CPWD Engineer Arrested In Bribery Case



सरकारी कार्यालयांमधील लाचखोरीच्या प्रकरणांवर सध्या तपास यंत्रणांकडून जोरदार कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD) एका कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना सीबीआयने अटक केली आहे. वडाळा येथील एका भूखंडा

.

या मोठ्या कारवाईत नवी मुंबईतील वाशी येथील एका कार्यकारी अभियंत्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याशिवाय, मुंबईतील एका रिअल इस्टेट ग्रुपचा उपाध्यक्ष, मॅनेजर आणि NOC मिळवणाऱ्या फर्मचा पार्टनर यांनाही अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान असे उघड झाले की, संबंधित अधिकाऱ्यांनी डिस्पॅच रजिस्टरमध्ये कोणतीही अधिकृत नोंद न करता 50 लाख रुपयांच्या बदल्यात भूखंडासाठी NOC दिली होती. तसेच, उर्वरित 20 लाख रुपयांची रक्कम एका आठवड्यानंतर देण्याचे ठरले होते. लाचेची 50 लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

छापेमारीत घबाड उघड

या कारवाईनंतर तपास यंत्रणांनी आरोपींच्या मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील विविध ठिकाणांवर छापे टाकले. या छापेमारीत लाचेच्या 50 लाखांव्यतिरिक्त 53.87 लाख रुपयांची रोख रक्कम आणि मालमत्तेशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना आज मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

पालिकेचे अधिकारीही एसीबीच्या जाळ्यात

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुंबईत आणखी एक लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला. गोवंडी येथील एका सार्वजनिक शौचालयाच्या साफसफाईचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल 3 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तक्रारदाराने लाच देण्यास स्पष्ट नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली होती. या तक्रारीनंतर एसीबीने कारवाई करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *