Headlines

Hatta Police Seize Tipper, Rs 7.15 Lakhs Illegal Sand Haul



हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत जोडजवळा शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह 7.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 22 रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

.

हिंगोली जिल्ह्यात वाळू घाटांवरून अवैध वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाची पथके कार्यरत ठेवली असून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस दलाची पथके सतर्क केली आहेत. या पथकाकडून वाळू घटाच्या मार्गावर दररोज वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारी वाहने जप्त केली जात आहेत.

दरम्यान, हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत जोडजवळा शिवारातून पूर्णा येथून एका टिप्परमध्ये वाळू आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार ताम्रध्वज कासले, सुर्यवंशी यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक टिप्पर थांबवून तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. सदर वाळू पूर्णा येथून आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी टिप्पर चालक सलमान काझी (रा. पुर्णा) याची चौकशी केली असता त्याच्या जवळ वाळू वाहतूकीची कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले शिवाय पोलिसांच्या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरेही देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू असा 7.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हट्टा पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या तक्रारीवरून सलमान काझी (रा. पुर्णा), अनिल बागल (रा. पूर्णा)यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *