Headlines

पुण्यात खेळताना घसरगुंडी अंगावर पडून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू:हडपसरमधील घटना; सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल




पुण्यातील हडपसरमधील मगरपट्टा भागात सोसायटीच्या आवारात लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून साडेचार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अनिका नवनाथ देवीकर असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. अनिका सोसायटीच्या आवारात खेळत असताना, व्यवस्थित न बसवलेली घसरगुंडी तिच्या डोके, चेहरा आणि मानेला लागली. यात तिला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेतील अनिकाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिकाचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर (वय 34, रा. वेदविहार सोसायटी, मगरपट्टा, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ देवीकर यांच्या फिर्यादीनुसार, सोसायटीच्या आवारातील घसरगुंडी व्यवस्थित बसवलेली नव्हती. ती काढून टाकण्याबाबत त्यांनी यापूर्वी अनेकदा सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले होते आणि वारंवार तक्रारीही केल्या होत्या. मात्र, पदाधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीतील अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक साने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अपघातात तरुणाचा दुर्देवी मृत्यू विश्रांतवाडी परिसरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विश्रांतवाडी येथील फुलेनगर परिसरात घडली. वेगावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली आणि दुचाकीस्वाराचा जीव गेला. या घटनेत त्याचा मित्रही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुजीत होरील सहानी (वय 30, रा. विश्रांतवाडी) हा अपघातात जखमी झाला असून त्‍याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अजय कुमार डोमन मंडल (रा. येरवडा, मूळ रा. बिहार) असे अपघाती मृत्‍यू झालेल्‍याचे नाव आहे. अजय आणि सुजीत हे दुचाकीवरून जात होते. अजय दुचाकी चालवत होता. मात्र, भरधाव वेगात असल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी विश्रांतवाडीजवळ फुलेनगर परिसरात रस्त्यावर घसरली. या अपघातात अजयला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *