Headlines

Bawankule Slams Congress Over MPSC Politics In Nagpur


“राज्यातील शेतकरी आणि शेतमजूर आज अस्मानी दुष्काळाच्या भीषण संकटात सापडला आहे. काही भागांत तर घरात अन्नाचा दाणा शिल्लक राहील की नाही अशी परिस्थिती आहे. अशा बिकट काळात फटाके फोडणे, ढोल-ताशे वाजवणे, उत्सव करणे किंवा बडेजाव मिरवणे महायुतीला अजिबात शोभत न

.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आशिष जयस्वाल, माजी खासदार कृपाल तुमाने, कवाळे, राजाभाऊ ताकसांडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी दुष्काळाची भीषणता, कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नावाखाली काँग्रेसकडून होणारे राजकारण, काँग्रेस कार्यालयातील पोलीस कारवाई आणि प्रा. अनिल सोले यांच्या नाराजीवर सविस्तर भाष्य केले.

सुधाकर कोहळे सर्व रेकॉर्ड मोडून विजयी होतील; दुष्काळामुळे रॅली रद्द

नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढतीविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, “महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा उमेदवारी अर्ज आज अधिकृतपणे दाखल करण्यात आला आहे. मागच्या वेळी या निवडणुकीत आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या. मात्र, यावेळी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने मैदानात उतरले असून, आतापर्यंतच्या पदवीधर निवडणुकीचे सर्व रेकॉर्ड मोडून कोहळे प्रचंड बहुमताने विजयी होतील.”

“आज 5 ते 6 हजार कार्यकर्त्यांची रॅली काढण्याचे नियोजन होते; पण शेतकरी निराशेच्या गर्तेत असताना आपण उत्सव साजरा करणे चुकीचे आहे. त्यामुळे रॅली तात्काळ रद्द करण्यात आली. महायुतीने निर्णय घेतला आहे की दुष्काळ संपेपर्यंत कोणताही नेता हार-सत्कार, भव्य वाढदिवस साजरे करणार नाही. तो सर्व निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जाईल.”

कोरोनापेक्षाही मोठे नैसर्गिक संकट; मे महिन्याचे ऊन ऑक्टोबरमध्येच!

दुष्काळाच्या दाहकतेवर वास्तववादी चित्र मांडताना महसूलमंत्र्यांनी धोक्याचा इशारा दिला, “कोरोना ही एक महामारी होती, पण यंदाचा दुष्काळ हे महाभीषण नैसर्गिक संकट आहे. मे महिन्यातील कडक उन्हाची झळ आपल्याला आत्ताच ऑक्टोबर महिन्यात सोसावी लागत आहे. पुढील आठ महिने कसे निघणार, हा मोठा यक्षप्रश्न आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पिकांचे नुकसान ही मोठी आव्हाने समोर आहेत.”

सगळे प्राधान्यक्रम बाजूला, शेतकऱ्यांची मदत पहिली

“विदर्भातील सोयाबीन, कापूस, धान, तूर उद्ध्वस्त झाली आहे, तर खान्देशात केळी आणि मराठवाड्यात हळद-मका करपला आहे. माझ्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली कॅबिनेट उपसमिती दररोज आढावा घेत आहे. रस्ते आणि इतर विकासकामांचा निधी कमी झाला तरी चालेल, पण शेतकऱ्यांची मदत हीच सरकारची पहिली आणि सर्वोच्च प्राथमिकता आहे. तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत संपूर्ण प्रशासन फिल्डवर उतरले आहे. उद्योगपतींपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाने जमेल तशी (१००, १ हजार ते २ हजार रुपये) मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवावी.”

शेतकऱ्यांची 90% कर्जमाफी पूर्ण; केवायसी व ॲग्री-स्टॅकसाठी तातडीचे निर्देश

शेतकरी कर्जमाफीच्या सद्यस्थितीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली आहे. जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून, केवळ 10 टक्के शेतकरी केवायसी (KYC) अपूर्ण असल्यामुळे किंवा ‘ॲग्री-स्टॅक’ प्रणालीशी जोडले न गेल्याने वंचित राहिले आहेत.”

“कालच मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ज्यांची कर्जमाफी मंजूर झाली आहे पण तांत्रिक अडचणी आहेत, त्यांचे केवायसी शिबिरे लावून तात्काळ पूर्ण करून घ्या. दिवाळीपूर्वी राज्यातील बळीराजाला संपूर्ण दिलासा देण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे.”

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नावाखाली काँग्रेसचे घाणेरडे राजकारण

विद्यार्थी आंदोलनावरून काँग्रेसवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी स्वतः दीड तास सकारात्मक चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या निवेदनांतील सर्व रास्त मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्यांना पूर्ण न्याय दिला आहे. असे असतानाही काँग्रेस पार्टी या मुद्द्यावर पोळ्या भाजण्याचे काम करत आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊ, अशी चिथावणीखोर भाषा काँग्रेस नेते वापरत आहेत. काँग्रेस राजकारणाने इतकी पिसाळलेली आहे की त्यांना विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शेतकऱ्यांचा दुष्काळ यातही केवळ राजकारणच दिसते.”

टिळक भवनातील कारवाईचे समर्थन

“लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण आंदोलनाच्या नावाखाली शासकीय मालमत्तेची तोडफोड करणे आणि सामाजिक शांतता भंग करणे खपवून घेतले जाणार नाही. हिंसाचार करायचा आणि राजकीय कार्यालयात जाऊन लपायचे, हे चालणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणारच.”

प्रा. अनिल सोले यांच्या नाराजीवर पडदा

भाजपचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संभाव्य नाराजीवर व बंडखोरीवर विचारले असता त्यांनी सामंजस्याची भूमिका मांडली. “प्रा. अनिल सोले हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. उमेदवारी न मिळाल्याने स्वाभाविकपणे थोडी निराशा येते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंडखोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. मी स्वतः अनिल सोले यांच्याशी चर्चा करणार असून, पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी काम करतील,” असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी व्यक्त केला.

——————————————————

हेही वाचा….

दुष्काळात पिण्याचे पाणीच पहिली प्राथमिकता: विदर्भातील जंगलांत चारा पिकवणार; महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा, आंदोलनातील तोडफोडीवरून काँग्रेसला खडे बोल

“शेतकरी आज दुष्काळाच्या भीषण संकटात असला, तरी तो आपले मूळ संस्कार, संस्कृती आणि अतिथीचा पाहुणचार कधीही विसरत नाही. बांधावर पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी स्वतःसाठी आणलेल्या डब्यातील भाकर, ठेचा आणि झुणका आम्हाला अत्यंत प्रेमाने खाऊ घातला,” अशी कृतज्ञता व्यक्त करत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.