Headlines

आसूड मोर्चा:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कुंभमेळ्यापेक्षा जास्त निधी द्या




दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तींच्या चक्रात भरडल्या जाणाऱ्या शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवरून सोमवारी (दि. ५) तेल्हारा तहसील कार्यालयावर ‘आसूड मोर्चा’ धडकला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली टॉवर चौकातून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले. हातात मागण्यांचे फलक, सरकारविरोधी घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि तातडीच्या मदतीसाठीचा आक्रोश यामुळे तेल्हारा शहराचे वातावरण आंदोलनमय झाले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना किमान ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच शेतकऱ्यांची बिनाअट सरसकट कर्जमाफी करून नव्याने पीककर्ज उपलब्ध करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दुष्काळाची परिस्थिती डोळ्यासमोर असताना शेतकऱ्यांना पुन्हा-पुन्हा पंचनामे आणि कागदोपत्री प्रक्रियेत अडकवण्याची गरज काय, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी शासनाने विलंब न करता तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कुंभमेळ्याला दिला जाणारा निधी किंवा त्यापेक्षाही अधिक निधी उपलब्ध करून द्या,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी तेल्हारा येथे घेतलेल्या आसूड मोर्चात मांडली. आसूड मोर्चा संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्यासह प्रशांत काशीराम डिक्कर, गजानन पाटील बंगाळे, शुभम इसापूरे, आशिष शेळके, रोशन देशमुख, वैभव खाडे, सुधाकर हागे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन येथील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. पीकविमा, बोगस बियाणे अन् नुकसानीबाबत संताप मागील वर्षीचा रखडलेला पीकविमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. तसेच चालू वर्षाचा १०० टक्के पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी आसूड मोर्चात करण्यात आली. सोयाबीनचे बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *