Headlines

ट्रकच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू; अपघातात मुलगी सुदैवाने बचावली:अहमदपूरमधील बाजारपेठेत खरेदीसाठी जात‎ असताना घडली दुर्घटना‎




अहमदपूर शहरातील गजबजलेल्या बसवेश्वर चौक परिसरात भरधाव ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत प्राध्यापक गौतम वाघमारे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांच्यासोबत मोटारसायकलवर असलेली त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली असून, ती सुदैवाने बचावली आहे. मूळचे बाबळदरा येथील रहिवासी असलेले प्रा. गौतम वाघमारे हे हाडोळती येथील कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात पाली विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते आपल्या मुलीसोबत मोटारसायकलवरून शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी जात होते. बसवेश्वर चौकात आले असता, ‘एमएच १४ डीजे ०१९१’ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात प्रा. वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. अहमदपूर शहरात रस्त्यांचे काम रखडले असून, दुरुस्तीच्या नावाखाली काढण्यात आलेले गतिरोधक अद्याप बसवण्यात आलेले नाहीत. बसवेश्वर चौकासारख्या गजबजलेल्या बाजाराच्या ठिकाणी वाहनांचा वेग अनियंत्रित असतो. गतिरोधक नसल्यामुळे येथे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या याच दुर्लक्षामुळे एका अभ्यासू प्राध्यापकाला नाहक आपला जीव गमवावा लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *