Headlines

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल:उदयनराजे भोसले संचालकपदी बिनविरोध




राज्यात विविध निवडणुकांची तयारी सुरू असतानाच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची घडामोड घडली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात अर्ज दाखल करणारे ज्ञानेश्वर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उदयनराजेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील पहिला गुलाल साताऱ्यात उधळला गेला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गृहनिर्माण आणि दूध संस्था मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वर पवार यांनीही संचालकपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक प्रक्रियेत पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला. छत्रपतींच्या गादीचा सन्मान आणि आदर म्हणून आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे ज्ञानेश्वर पवार यांनी स्पष्ट केले. उदयनराजेंच्या बिनविरोध निवडीने समर्थकांमध्ये उत्साह उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांची संचालकपदी बिनविरोध निवड निश्चित झाली. या निवडीची माहिती समोर आल्यानंतर उदयनराजे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी बुके देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदांसाठी एकूण 236 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीनंतर 224 अर्ज वैध ठरले आहेत. आता अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. ‘पदाची अपेक्षा नाही, सर्वसामान्यांचा उत्कर्ष हाच उद्देश’ बिनविरोध निवड झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी आपल्या भूमिकेबाबत भाष्य केले. जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी अर्ज करण्यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील उपेक्षित घटकांची जास्तीत जास्त सेवा व्हावी, हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये सहकारी संस्था अडचणीत येऊन लिक्विडेशनमध्ये गेल्या आहेत. यामागे राजकारण हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे उदयनराजे म्हणाले. सहकार चळवळ ही ‘लोकांनी, लोकांसाठी’ या विचारातून सुरू झाली होती. मात्र, या मूळ उद्देशापासून सहकार क्षेत्र दूर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हा बँकेची चांगली कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भविष्यात इतर काही सहकारी बँकांप्रमाणे या बँकेची अवस्था होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील गरजू घटकांना अधिक चांगली सेवा मिळावी, यासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. आपल्याला कोणतेही पद मिळावे किंवा त्यातून वैयक्तिक फायदा व्हावा, अशी अपेक्षा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलणार का? दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार का, असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हा विषय वेगळा असल्याचे सांगितले. निवडणुका पुढे ढकलायच्या की नाही, याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड ही सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील पहिली मोठी राजकीय घडामोड ठरली आहे. त्यांच्या या निवडीमुळे आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा… हिंगोलीतील 50 वर्षाची साधना अवघ्या 10 मिनीटात जळून खाक:तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार जळाले; घटनास्थळावरील दृश्य पाहून विद्यार्थ्यांचेही डोळे पाणावले हिंगोली शहरात मागील 50 वर्षापासून संगीत साधना विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचे धडे देणाऱ्या विद्यालयातील तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार जळून खाक झाले. मागील 50 वर्षापासूनची संगीत साधना अवघ्या दहा मिनीटात जळून खाक झाली. मंगळवारी (ता. 6) गायनाचे धडे घेणाऱ्या शिष्यांचे घटनास्थळावरील परिस्थिती पाहून डोळे पाणावले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *