Headlines

Raju Shetti Slams Sugar Factory Owners Over ED-CBI Pressure


“साखरेची एमएसपी आणि इथेनॉलचे खरेदी दर वाढवून कारखानदारांना नफ्यात आणण्यासाठी आम्ही केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरून रक्त आटवत आहोत. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या दबावाला आणि ईडी (ED), सीबीआयच्या (CBI) चौकशीच्या भीतीने काही लाचार कारखानदार शेतकरी आंदोलना

.

साखर कारखाने सुरू करण्याच्या काही कारखानदारांच्या हालचालींवर राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया व्हिडिओ आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक 25व्या ऊस परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

कारखानदारांमध्ये लढायची हिंमत नाही, तरीही केंद्र सरकारची चमचेगिरी!

कारखानदारांच्या दुटप्पी भूमिकेवर तोफ डागताना राजू शेट्टी म्हणाले, “इथेनॉलचे दर वाढले आणि साखरेची किमान विक्री किंमत (MSP) वाढली, तर त्याचा थेट आर्थिक फायदा साखर कारखानदारांनाच होणार आहे. केंद्र सरकारशी स्वतःच्या हितासाठी दोन हात करण्याची हिंमत राज्यातील साखर सम्राटांमध्ये नाही; म्हणून शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढत आहेत. मात्र, अशा निर्णायक वळणावर केंद्राला खूश करण्यासाठी काही कारखानदार क्षमता नसतानाही धुराडी पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

आंदोलनात मिठाचा खडा टाकू नका

“केंद्राच्या तपास यंत्रणांच्या भयापोटी आंदोलनात खोडा घालणाऱ्या कारखानदारांनी ध्यानात ठेवावे, या आंदोलनातून मोकळे झाल्यानंतर शेतकरी तुम्हाला गाठल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकरी संघटनेशी गद्दारी करणाऱ्या या गद्दारांचा कायमचा राजकीय व सामाजिक काटा कसा काढायचा, याचा विचार आता शेतकऱ्यांनीच केला पाहिजे.”

8 टक्के रिकव्हरीवर गाळप म्हणजे कारखाना आणि शेतकरी दोघांचेही मरण!

ऐन दुष्काळात आणि अपरिपक्व उसाच्या गाळपावर त्यांनी गणित मांडून कारखानदारांचे डोळे उघडले. “सध्या अनेक उसाच्या शेतांमध्ये जाऊन पाहणी केली असता, उसाची सरासरी साखर उतारा (रिकव्हरी) ८ टक्क्यांच्या पुढे जात नाही. केंद्र सरकारच्या नियमानुसार 10.25 टक्के रिकव्हरीला 3,650 रुपये एफआरपी (FRP) देणे कारखान्यांना बंधनकारकच आहे. म्हणजेच, अवघ्या 8 टक्के रिकव्हरीचा कच्चा व कोवळा ऊस गाळला तरी कारखानदारांना खिशातून प्रतिटनामागे किमान 800 रुपये अतिरिक्त एफआरपी द्यावी लागणार आहे.”

वर्षभराची रिकव्हरी घसरणार; शेतकऱ्यांचा मोठा तोटा

“सुरुवातीलाच कच्चा ऊस तोडल्यामुळे संपूर्ण हंगामाची सरासरी साखर रिकव्हरी घसरणार आहे. याचा थेट फटका उर्वरित शेतकऱ्यांच्या दरावर बसेल. त्यामुळे ज्यांचा ऊस आत्ता तुटत नाही, त्या शेतकऱ्यांनीही साखर कारखानदारांना जाब विचारला पाहिजे की, तुमच्या या आत्मघातकी निर्णयामुळे आमचा अंतिम उसाचा दर कमी झाला, तर आम्ही ते खपवून घेणार नाही.”

केंद्र अडचणीत आहे; अटी मान्य केल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही

आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना शेट्टी यांनी केंद्र सरकारची कोंडी अधोरेखित केली. “देशात साखरेचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती असल्याने केंद्र सरकार स्वतः अडचणीत आले आहे. त्यांना साखर कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. आम्ही ठाम भूमिका घेतली आहे की, जोपर्यंत इथेनॉलचे खरेदी दर वाढवले जात नाहीत आणि साखरेची एमएसपी वाढवली जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात एकही साखर कारखाना चालू दिला जाणार नाही.”

“अशा वेळी कारखानदारांनी ठरवावे की त्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्याला मूक संमती देऊन पाठीशी उभे राहायचे की सरकारपुढे शेपूट घालून शेतकऱ्यांच्या मुळावर उठायचे.”

10 ऑक्टोबरला 25 वी ऊस परिषद

शेतकरी आंदोलनाला अंतिम स्वरूप देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. राजू शेट्टी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पोस्टमध्ये जाहीर आवाहन केले आहे..

QuoteImage

“शेतकरी कारखानदारांच्या हितासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर लढतोय. मात्र काही कारखानदार ईडी व सीबीआयच्या कारवाईस घाबरून साखर कारखाने सुरू करून आंदोलनात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 25व्या ऊस परिषदेस घामाच्या दामासाठी …. यायला लागतंय ….!”

QuoteImage

10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रौप्यमहोत्सवी 25 व्या ऊस परिषदेत राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणार असून, ऊस दराची पहिली उचल (FRP) आणि साखर कारखाने रोखण्याबाबत या परिषदेत अंतिम व निर्णायक रणशिंग फुंकले जाणार आहे. यामुळे आगामी गाळप हंगामापूर्वी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ऊस पट्ट्यात मोठे वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

———————————————–

हेही वाचा…

बंदुकीच्या बळावर पावणेतीनशे खासदारांना रोखणारे आता का लपलेत?:दुष्काळात शेकडो कोटींच्या जाहिरातींची उधळपट्टी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

“केंद्रीय निवडणूक आयोग ही संविधानाने निर्माण केलेली निष्पक्ष संस्था न उरता, ती पूर्णपणे भाजप आणि मोदी-शाहांच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. दिल्लीत पावणेतीनशे खासदारांना संविधानाचा हक्क मागण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना बंदुकांच्या धाकावर रोखण्यात आले. रात्री उशिरापर्यंत महिला खासदारांशी गैरवर्तन झाले आणि राहुल गांधींना रात्री उशिरापर्यंत डांबून ठेवण्यात आले. मात्र, हा लढा आता थांबणारा नसून देशभरात त्याचा भडका उडाला आहे,” असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.