![]()
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात पोलिसांनी माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ६ ऑक्टोबर रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. माओवादी नक्षल सप्ताह, निवडणुका आणि सुरक्षा दलांविरोधातील हल्ल्यांसाठी हा शस्त्रसाठा वापरत असत. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) शोधमोहीम राबवली. या कारवाईत एक .३०३ रायफल, दोन सिंगल शॉट रायफल, दोन गावठी पिस्तूल, एक बीजीएल लाँचर, १० बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे, सात डेटोनेटर आणि १५० मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. तसेच दोन मॅगझिन, दोन कुकर, तीन वॉकीटॉकी, तीन चार्जर आणि दोन वॉकीटॉकी बॅटऱ्याही मिळाल्या. अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक सुनील उईके यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वी झाली. मोहिमेतील जवानांचे कौतुक करण्यात आले. हेही वाचा.. MPSC आंदोलनाचा सातवा दिवस: महाज्योतीच्या गोंधळामुळे रोहित पवारांचा संताप, म्हणाले- आता एमपीएससी अध्यक्षांसह मंत्री अतुल सावेंचाही राजीनामा घ्या पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर महाज्योतीच्या स्कॉलरशिप परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींना परीक्षा देता आली नसल्याचा दावा करण्यात आला. सकाळी ९ ते ११ अशी परीक्षेची वेळ असतानाही सुमारे दोन तास विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेर थांबल्या होत्या. अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थिनींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. सविस्तर वाचा
Source link
गडचिरोलीत जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त:कोपर्शी जंगलातून BGL लाँचरसह रायफल-पिस्तुले हस्तगत