“गेल्या 12 वर्षांत भारत विकासाच्या शिखरावर पोहोचला असून देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि चौथी प्रमुख सैन्यशक्ती बनला आहे. भारताची ही नेत्रदीपक घोडदौड जगातील प्रस्थापित बलाढ्य देशांच्या डोळ्यांत खुपत आहे. त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पात
.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत परिणय फुके यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, मतदार यादीतील 13 कोटी नावांचे वास्तव, काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन, पुण्यातील एमपीएससीचा लढा आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील बंडखोरीवर पक्षाची आक्रमक व सविस्तर भूमिका मांडली.
13 कोटी नावांच्या आडून देशवासीयांची दिशाभूल; मतदार यादीतून रोहिंग्या-बांगलादेशींना बाहेर काढले!
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर केलेल्या १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांची फुके यांनी आकडेवारीनिशी चिरफाड केली.
13 कोटी वगळलेल्या नावांचे वर्गीकरण:
- 2.8 कोटी: मृत व्यक्तींची नावे, जी नियमानुसार यादीतून काढण्यात आली.
- 3 कोटी: दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेले (अनुपस्थित) मतदार.
- 6.3 कोटी: कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार, ज्यांच्या घरी बीएलओ (BLO) जाऊनही कोणताही पुरावा किंवा व्यक्ती आढळली नाही.
- सुमारे 1 कोटी: दुबार (Duplicate) नावे किंवा नावांच्या स्पेलिंगमधील चुका असलेले मतदार.
काँग्रेसची खरी पोटदुखी काय?
“अनुपस्थित आणि कायमस्वरूपी स्थलांतरित असलेल्या 9 कोटींहून अधिक नावांमध्ये निम्मा भरणा हा काँग्रेसच्या कार्यकाळात देशात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांचा होता. निवडणूक आयोगाने अशा बोगस मतदारांची नावे हटवल्यामुळेच राहुल गांधी आणि काँग्रेसचे मतांचे गणित बिघडले असून, त्यातूनच ही पोटदुखी सुरू झाली आहे.”
युवक काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींचे चेले-चपाटे; षड्यंत्र कळल्यास आंदोलन थांबवतील
मुंबई, नागपूर आणि कल्याण येथे भाजप कार्यालयांवर युवक काँग्रेसने केलेल्या निदर्शनांवर फुके यांनी कडाडून टीका केली. “भाजप कार्यालयांवर धावून जाणारे हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते केवळ राहुल गांधींचे चेले-चपाटे आहेत. राहुल गांधींच्या या आंदोलनामागे देशाची बदनामी करण्याचे विदेशी षड्यंत्र आणि माओवादी विचारसरणी आहे, हे ज्या दिवशी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना समजेल, त्या दिवशी ते स्वतःहून हे आंदोलन बंद करतील.”

आंदोलन केवळ राहुल गांधींच्या भेटीपुरते; रोहित पवार 6 महिन्यांत काँग्रेसमध्ये जाणार!
पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा आंदोलनावर परिणय फुके यांनी राजकीय भाकीत वर्तवले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या 13 पैकी 12 प्रमुख मागण्या आधीच मान्य केल्या आहेत. राहिलेला अध्यक्षांच्या राजीनाम्याचा विषय हा राज्य शासनाच्या अखत्यारीतील नसून राष्ट्रपतींच्या अखत्यारीतील कायदेशीर विषय आहे. तरीही केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी रोहित पवार विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत.”
राष्ट्रवादीत अंतर्गत वर्चस्वाची लढाई
“शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात सध्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात पक्षाच्या नेतृत्वावरून उघड वर्चस्वाची लढाई सुरू आहे. राष्ट्रवादीत स्वतःचे नेतृत्व स्वीकारले जात नसल्याने आणि डावलले गेल्यामुळे दुखावलेले रोहित पवार आता काँग्रेसच्या वाटेवर आहेत.”
भविष्यवाणी
“माझी ही भविष्यवाणी लिहून ठेवा— केवळ राहुल गांधींवर प्रभाव टाकण्यासाठी आणि चमकोगिरी करण्यासाठीच रोहित पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन वेठीस धरले आहे. ज्या दिवशी राहुल गांधी पुण्यात येऊन आंदोलनाला भेट देतील, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे आंदोलन गुंडाळले जाईल आणि पुढील सहा महिन्यांत रोहित पवार अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील!”
अनिल सोले आमचे मार्गदर्शक, दोन दिवसांत माघार घेतील
नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजप सहप्रभारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर पक्षातील बंडखोरीवर फुके यांनी सामंजस्याची भूमिका मांडली. “या मतदारसंघात 2.55 लाख नोंदणीकृत मतदार असून त्यापैकी निम्म्या मतदारांची नोंदणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे हे बहुजन समाजाचे मोठे नेते असून ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील.”
सोले यांची मनधरणी होणार
“माजी आमदार प्रा. अनिल सोले हे आमचे सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक आहेत. खुद्द सुधाकर कोहळेंना राजकारणात आणण्यात आणि आमच्या पिढीला घडवण्यात सोले सरांचे मोठे योगदान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्यांच्याशी चर्चा करत असून, पुढील दोन दिवसांत अनिल सोले आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि भाजप एकदिलाने ही लढाई जिंकेल,” असा ठाम विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.
————————————————-
हेही वाचा…
MPSCच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसमध्ये एन्ट्रीचा डाव!:गोपीचंद पडळकरांची टीका, म्हणाले- सख्ख्या चुलत्याचे न झालेले रोहित पवार विद्यार्थ्यांचे कसे होतील?

“पुण्यात सुरू असलेले एमपीएससीचे (MPSC) आंदोलन हे विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी प्रायोजित केलेला हा अजेंडा आहे. 30 तारखेलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 पैकी 17 प्रतिनिधी रोहित पवारांचे असतानाही अडीच तास चर्चा करून सर्व सकारात्मक मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, श्रेय मुख्यमंत्र्यांना जाईल म्हणून रोहित पवारांनी आंदोलन लांबवले. जो स्वतःच्या चुलत्याचा आणि सख्ख्या चुलत भावांचा होऊ शकला नाही, तो विद्यार्थ्यांचा काय होणार? केवळ राहुल गांधींवर छाप पाडण्यासाठी आणि काँग्रेसमध्ये स्वतःचे राजकीय बस्तान बसवण्यासाठी रोहित पवार स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळत आहेत,” असा हल्लाबोल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी