“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक सरकारचे प्रमुख (हेड ऑफ द स्टेट / सरकारचे प्रमुख) म्हणून आज यशस्वीरीत्या 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि तिथून सुरू झालेला हा विकासप्
.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या प्रशासकीय आणि राजकीय वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक झेप आणि गरिबी निर्मूलनाचा संदर्भ देत फडणवीस यांनी ‘विकसित भारत 2047’ चा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘फ्रॅजाईल फाईव्ह’ ते जगातील ‘टॉप 5’ अर्थव्यवस्था
पंतप्रधानांच्या गेल्या 12 वर्षांतील आर्थिक आणि प्रशासकीय कामगिरीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “2014 पूर्वी भारताची गणना डळमळीत आणि संकटग्रस्त मानल्या जाणाऱ्या ‘फ्रॅजाईल फाईव्ह’ देशांमध्ये होत होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले धाडसी आर्थिक निर्णय, पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्तीच्या बळावर आज भारताने जगातील सर्वोच्च पाच बलशाली अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.”
25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले
“देशातील गोरगरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना केंद्रस्थानी ठेवून कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या. परिणामी, तब्बल 25 कोटी देशबांधवांना बहुआयामी गरिबीच्या खाईतून बाहेर काढून सन्मानाने जगण्याची नवी व्यवस्था निर्माण करण्यात सरकारला यश आले आहे.”
2001 ते 2026: गुजरात ते दिल्ली, 24 तास राष्ट्रसेवेची 25 वर्षे
फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाची महती सांगताना नमूद केले. “7 ऑक्टोबर 2001 रोजी भूकंप आणि आर्थिक संकटात सापडलेल्या गुजरातची धुरा मोदींनी सांभाळली होती. तिथून त्यांनी गुजरातचा कायापालट करून विकासाचे मॉडेल देशासमोर ठेवले. त्यानंतर 2014 पासून आजतागायत त्यांनी अखंड देशसेवा करत भारताला जागतिक महासत्तेच्या दिशेने नेले आहे. आज सरकार प्रमुख म्हणून त्यांनी 25 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. हे नेतृत्व 24 तास देशाच्या प्रगतीचा विचार करणारे आहे. प्रत्येक घटकाला न्याय देणे आणि भारताचा मानबिंदू जगात उंचावणे हेच या 25 वर्षांच्या कारकिर्दीचे सार आहे.”
2047चा विकसित भारत साकारणारच; वी विल डू इट’चा नवा नारा!
स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी देशाच्या भविष्यातील संकल्पावर भर दिला. “पंतप्रधान मोदींनी देशाला 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न दिले आहे. हे केवळ स्वप्न नसून आमचा राष्ट्रीय संकल्प आहे. ही ‘सेवा संकल्प यात्रा’ अशीच अखंडपणे पुढे चालत राहील.”
वी विल डू इट
“महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज या संकल्पाच्या पाठीशी उभा आहे. ‘वी विल डू इट’ हा दृढ निर्धार आज आम्ही केला असून, 2047 पर्यंत भारताला पूर्णतः विकसित, आत्मनिर्भर आणि जगाचे नेतृत्व करणारा देश बनवूनच दाखवू,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
——————————————————
हेही वाचा…
बंदुकीच्या बळावर पावणेतीनशे खासदारांना रोखणारे आता का लपलेत?:दुष्काळात शेकडो कोटींच्या जाहिरातींची उधळपट्टी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

“केंद्रीय निवडणूक आयोग ही संविधानाने निर्माण केलेली निष्पक्ष संस्था न उरता, ती पूर्णपणे भाजप आणि मोदी-शाहांच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. दिल्लीत पावणेतीनशे खासदारांना संविधानाचा हक्क मागण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना बंदुकांच्या धाकावर रोखण्यात आले. रात्री उशिरापर्यंत महिला खासदारांशी गैरवर्तन झाले आणि राहुल गांधींना रात्री उशिरापर्यंत डांबून ठेवण्यात आले. मात्र, हा लढा आता थांबणारा नसून देशभरात त्याचा भडका उडाला आहे,” असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी