![]()
नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी एका दिवसात २,०८० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईतून ७ लाख ९१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक शिस्तीसाठी ही विशेष मोहीम राबवली. या कारवाईत सर्वाधिक १,१५६ जणांवर विनाहेल्मेट वाहन चालवल्याबद्दल दंड आकारला. चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या ३२८ वाहनचालकांवरही कारवाई झाली. परवाना नसलेले आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारे प्रत्येकी १०३ चालक आढळले. चुकीच्या बाजूने ६२, ट्रिपल सीट ५८, वेगमर्यादा उल्लंघन करणारे ४३ जण होते. दारू पिऊन गाडी चालवणारे ३३, सीटबेल्ट न लावणारे ३३, फॅन्सी नंबरप्लेट वापरणारे २१ आणि सिग्नल तोडणारे १७ चालकही यात होते. या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून, वाहतुकीत शिस्त आणणे आणि अपघातांचा धोका कमी करणे हा आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.
Source link
नागपुरात एका दिवसात 2,080 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई:7.91 लाख रुपयांचा दंड वसूल; विनाहेल्मेटची 1,156 प्रकरणे, पोलिसांची मोहीम