Headlines

हातभट्टीची दारू विकणारा सराईत गुंड अतुल खंडाळे स्थानबद्ध:अमरावती ग्रामीण पोलिसांनी MPDA कायद्यांतर्गत वर्षभरासाठी केली कारवाई




अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी दारू विकणाऱ्या अतुल बाबाराव खंडाळे (वय ३९, रा. लोणी, ता. वरुड) याला वर्षभरासाठी स्थानबद्ध केले आहे. तो परिसरात दहशतही पसरवत होता. महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या घातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या (एमपीडीए) अधिनियमान्वये ही कारवाई झाली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार, बेनोडा पोलिसांनी खंडाळेविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी आदेश जारी करत त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले. या आदेशाची अंमलबजावणी ७ ऑक्टोबर रोजी झाली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, बेनोडाचे ठाणेदार विवेक देशमुख आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यात गुन्हेगारांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *