Headlines

अमरावतीत पाणीटंचाई: पिण्याच्या पाण्यात 10 टक्के कपात लागू:16 ऑक्टोबरपासून अंमल, सार्वजनिक पाणी स्रोतांपासून 500 मीटर परिसरात नवीन विहिरींना बंदी




अमरावती जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यात १० टक्के कपात करण्याचा आदेश जारी झाला आहे. सार्वजनिक पाणी स्रोतांपासून ५०० मीटर परिसरात नवीन विहिरी खोदण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश १६ ऑक्टोबरपासून लागू होतील. भूजलाची खालावलेली पातळी आणि भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हे निर्देश दिले आहेत. ते जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत. अमरावती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यास सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून १ किलोमीटरच्या आत असलेल्या विहिरींचे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरता येईल. शेती किंवा उद्योगासाठी त्याचा वापर करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पंप, पाइपलाइन आणि बोअरवेल मशीन जप्त केली जाईल. महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ आणि इतर कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *