Headlines

Praniti Shinde Supports MPSC Students; Warns Government Over Crackdown


MPSCच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आंदोलन सुरू ठेवाव

.

प्रणिती शिंदे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “2 ते 3 दिवसांत पोलीस येतील, लाठीचार्ज होऊ शकतो; मात्र तुम्ही मागे हटू नका, ही लढाई लढा,” असे आवाहन केले. आंदोलनाला परवानगी असतानाही आंदोलकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांची ही लढाई केवळ त्यांच्या प्रश्नांसाठी नसून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘पोलिसांना पाहून समजेना, अटक करायला आले की आंदोलनात सहभागी व्हायला?’

आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहून प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. “पोलिसांना पाहून मला समजेना, ते आपल्यात सहभागी व्हायला आले आहेत की अटक करायला?” असा सवाल त्यांनी केला. सरकार अहंकारी आणि निगरगट्ट असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

“लोकशाहीसमोर शेवटी सगळ्यांनाच झुकावे लागते. युवाशक्तीने लोकशाहीची ताकद दाखवून द्यावी,” असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या ताब्यात घेण्याचा संदर्भ

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी जात असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने सोडले. गेल्या 24 तासांत दोघांना दोनदा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावरही निशाणा साधला.

गांधींच्या विचारांचा आणि संविधानाच्या मूल्यांचा देशाच्या राजकारणावर असलेला प्रभाव बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताचा ‘DNA’ हा गांधींच्या विचारांचा, संविधानाचा आणि सर्वधर्मसमभावाचा असल्याचे त्या म्हणाल्या.

‘शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न गंभीर’

राज्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या प्रश्नांवरूनही प्रणिती शिंदे यांनी सरकारला घेरले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मागील अतिवृष्टीची मदतही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारने या घटकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. “तिकडे शेतकऱ्यांचा अंत पाहिला जात आहे आणि इथे विद्यार्थ्यांचा,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

‘मीही MPSCची तयारी केली होती’

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या शिक्षणाच्या काळातील अनुभवही सांगितला. “मीही MPSCची तयारी केली होती. मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर मी कायद्याचे शिक्षण घेतले,” असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना घेतलेले कष्ट आणि त्यासाठी खर्च होणारा वेळ लक्षात घेऊन सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

SIRच्या मुद्द्यावरूनही केंद्रावर टीका

प्रणिती शिंदे यांनी SIRच्या माध्यमातून मतदारयादीतील नावांच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“एसआयआरच्या माध्यमातून देशाचा डीएनए बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेचा परिणाम सामान्य मतदारांवर होऊ नये आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘FIR होऊ द्या, मागे घेण्याची ताकदही आपल्यात आहे’

आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करण्याची भीती विद्यार्थ्यांनी बाळगू नये, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. “FIR करू द्या. ती मागे घेण्याची ताकदही आपल्यात आहे,” असे सांगत त्यांनी आंदोलकांना धीर दिला.

सरकारी यंत्रणेतील अधिकारी अनेकदा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांपेक्षा निर्णय घेणाऱ्या राजकीय नेतृत्वाला जबाबदार धरले. आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांचा मोठा वाटा असेल, असेही त्यांनी सांगितले.

‘पहिली विकेट गेली, आता दुसरीही जाणार’

आपल्या भाषणात प्रणिती शिंदे यांनी राजकीय संघर्षाचा संदर्भ देत “पहिली विकेट गेली, आता दुसरी विकेट महाराष्ट्रात जाणार,” अशी आक्रमक भूमिका मांडली. काही नेत्यांविरोधातील कारवाईचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन राज्यासाठी मदत आणि पॅकेज मागत असल्याचा संदर्भ देत त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पुरेशी मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी संविधानाची शपथ घेतलेली असल्याने त्यांनी जनतेसमोर जबाबदारीने उभे राहावे, असेही त्या म्हणाल्या.

‘या लढाईत तुमचा सिंहाचा वाटा असेल’

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत प्रणिती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नका, असा संदेश देत त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी केली. “युवाशक्तीने आपली ताकद दाखवून दिली तर लोकशाही काय असते, हे सरकारला कळेल. या लढाईत तुमचा सिंहाचा वाटा असणार आहे,” असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

हेही वाचा…

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला:राष्ट्रवादीला झुकते माप, भाजप-शिवसेनेला समान जागा, 18 ऑक्टोबरला मतदान

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून 25 जागांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 9 जागा देण्यात आल्या असून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला प्रत्येकी 7 जागा मिळणार आहेत. जनसुराज्य पक्षाच्या वाट्याला 2 जागा देण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.